घरकाम करणाऱ्या महिलेने आठ लाखांचे दागिने चोरले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे - घरकाम करणाऱ्या महिलेने बनावट चाव्या बनवून ज्येष्ठ नागरिकाच्या घरातील पावणेआठ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शंकरशेठ रस्त्यावरील मीरा सोसायटीमध्ये घडली. 

पुणे - घरकाम करणाऱ्या महिलेने बनावट चाव्या बनवून ज्येष्ठ नागरिकाच्या घरातील पावणेआठ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शंकरशेठ रस्त्यावरील मीरा सोसायटीमध्ये घडली. 

याप्रकरणी संजय दोडेजा (वय 55, रा. शंकरशेठ रस्ता) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोडेजा यांच्याकडे अनेक दिवस एक महिला घरकाम करण्यासाठी येत होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी तिने वैयक्तिक कारणास्तव काम सोडले. मात्र, काम सोडण्यापूर्वी तिने घराच्या बनावट चाव्या तयार करून घेतल्या. त्या आधारे घरामध्ये प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोने व हिऱ्याचे पावणेआठ लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना जून ते ऑगस्ट या कालावधीत घडली. दरम्यान, दोडेजा यांनी काही दिवसांपूर्वी कपाट उघडून बघितले, त्या वेळी कपाटात दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: 8 lakhs stolen jewelry in pune

टॅग्स