पुण्यात आणखी आठ मेट्रो मार्ग

Metro
Metro

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) एल ॲण्ड टी कंपनीने सादर केलेल्या ‘सर्वंकष वाहतूक आराखड्यात’ (कॉम्प्रिहेन्सिव मोबिलिटी प्लॅन-सीएमपी) सुमारे १९५.२६ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. पीएमआरडीएने हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाव्यतिरिक्त आणखी आठ मार्गांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी महापालिकेकडून वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या सुरूच आहे.

पीएमआरडीएने सात हजार २०० चौरस किलोमीटर हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम एल ॲण्ड टी कंपनीला दिले आहे. कंपनीने पहिल्या टप्प्यात दोन हजार चौरस किलोमीटर लांबीच्या परिसरातील वाहतुकीचा आराखडा तयार करून पीएमआरडीएला सादर केला आहे. तर वाहतूक सुरळीत आणि गतिमान करण्यासाठी सुमारे ६६ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यामध्ये मेट्रो प्रकल्पांचाही समावेश आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. आराखड्यात या मार्गाच्या विस्तारीकरणाबरोबरच नव्याने आठ मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. हे मार्ग दोन टप्प्यात उभारण्याचे नियोजन असून, २०३८ पर्यंत ते पूर्ण करण्याची शिफारस आहे. 

पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगरपाठोपाठ आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी कोणत्या मार्गावर हे प्रकल्प राबविता येतील, या संदर्भातील पूर्वसूसाध्यता (प्री फिजिबिलिटी रिपोर्ट) तयार करून घेण्यासाठी दिल्ली मेट्रो या कंपनीला काम दिले होते. त्यासाठी अर्थसंकल्पात पंधरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 
मात्र प्राधिकरणाने त्यांच्या हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करावा, त्यानंतर मेट्रोचे जाळे निश्‍चित करावे, असे दिल्ली मेट्रोकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार पीएमआरडीएकडून आराखडा तयार करून घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com