चंदननगर, खराडीत कोरोना पसरतोय पाय...

Coronavirus.jpg
Coronavirus.jpg

रामवाडी (पुणे) : सोमनाथमळा चंदननगर - खराडी येथे आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने परिरारातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथमळा येथील रुग्णाला प्रथम ताप आल्याने तो खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. तिथे कोरोना टेस्ट घेण्यात आली. रिपोर्ट् पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या पंधरा व्यक्तीची तपासणी केली असता अजून सात पॉझिटव्ह रुग्ण आढळले आहेत.

सध्या काही खासगी तर काही सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्याने विनाकारण नागरिक घराबाहेर पडत आहे. चौकाचौकात मित्रमंडळीसह गप्पा मारत उभे असणारे घोळके दिसत आहेत. काही नागरिक विना मास्क घराबाहेर पडत आहे. त्यामुळे चंदननगर व खराडी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत वाढ होत आहे.

चंदननगर खराडी येथे  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 146 होती. गेल्या आठवड्या पर्यत 109 रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर 33 रुग्ण सरकारी तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. एकूण रुग्णांपैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या तीनही प्रभागात नागरिक कोरोना विषयी गांभीर्याने घेतले जात नसल्याने प्रशासनाची मात्र डोकेदुखी वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com