Gram Panchayats Election : पुणे जिल्ह्यातील एकूण 176 ग्रामपंचायतीसाठी 80.79 टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

80 percent polling for 176 Gram Panchayats election  in pune district politics

Gram Panchayats Election : पुणे जिल्ह्यातील एकूण 176 ग्रामपंचायतीसाठी 80.79 टक्के मतदान

इंदापूर : पुणे जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती वगळता 176 ग्रामपंचायत साठी आज रविवार (ता.18) रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली. जिल्ह्यातील काही तालुक्यामधील ग्रामपंचायतीमध्ये तुरळक वादविवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये एकूण 3 लाख 3 हजार 213 मतदारांपैकी 2 लाख 45 हजार 166 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अतिशय चुरशीने झालेले या निवडणुकांमध्ये एकूण 80.79 टक्के मतदान झाले.

पुणे जिल्ह्यातील डिसेंबर 2022 अखेर मुदत संपणाऱ्या 221 ग्रामपंचायतची निवडणूक होती. या निवडणूकीमध्ये 49 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली.तर 5 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकही अर्ज न आल्याने त्या गावचे सरपंच पद रिक्तच राहणार आहे. 167 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी व एकूण 176 ग्रामपंचायतीसाठी 651 मतदान केंद्रावर मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण 1853 सदस्य पदाच्या जागांपैकी 712 जागा बिनविरोध झाल्या तर 79 सदस्य पदासाठी एकही अर्ज आला नाही.यामुळे उर्वरित 1062 जागांसाठी मतदान झाले.

ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारच्या निमित्ताने गेली आठ दिवस ग्रामीण भागात प्रचाराचा धुराळा उडाला होता.दिवस रात्र एक करून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे ऐन गुलाबी थंडीत राजकारण तापले होते.ते आता निकालापर्यंत शांत झाले आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभा असलेल्या उमेदवारांचे मतदानरुपी भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये बंदीस्त झाले आहे. निकालासाठी उमेदवारांना एक दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मतमोजणी मंगळवार (ता.20) रोजी होणार असल्याने उमेदवारांची तसेच मतदारांची उत्सुकता एक दिवस कायम जाणार आहे. मतमोजणी प्रत्येक तालुकास्तरावर केली जाणार आहे.

तालुका, मतदान झालेल्या ग्रामपंचायती, एकूण मतदार, झालेले मतदान - टक्केवारी

1) वेल्हे - 25 - 15148 - 12745 - 84.90

2) भोर - 30 - 22910- 19942 - 85.08

3) दौड - 8 - 15446 - 12966 - 83.94

4) बारामती - 13 - 37023- 31442 - 84.93

5) इंदापूर - 26 - 57760 - 48351 - 83.71

6) जुन्नर - 13 - 19456 - 16657 - 83.52

7) आंबेगांव - 16 - 41536 - 31523 - 75.89

8) खेड - 21 - 25601 -18381 - 72.11

9) शिरुर - 4 - 13523 -11368 - 84.06

10) मावळ - 8 - 14577 - 11605 - 79.61

11) मुळशी - 5 - 2306 - 1979 - 85.82

12) हवेली - 7 - 37923 - 28657 - 75.56

एकूण - 176 - 303213 - 245166 - 80.79