लोहगाव विमानतळासाठी ८०० कोटींचा निधी

Pune-Airport
Pune-Airport

पुणे - लोहगाव विमानतळावरून आणखी २० नव्या उड्डाणांना परवानगी मिळावी म्हणून वायुदलाशी संपर्क साधला असून, त्याबाबत प्रशासकीय पाठपुरावा वेगाने सुरू झाला आहे. दरम्यान, विमानतळ विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यातील सुमारे ४२३ कोटी रुपयांच्या कामाला २० ऑक्‍टोबरपासून सुरवात होणार आहे.

विमानतळाच्या विस्तारीकरण कामाची माहिती खासदार अनिल शिरोळे आणि विमानतळ संचालक अजयकुमार यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. शिरोळे म्हणाले, ‘‘लोहगाव विमानतळाकडे या पूर्वी २६ एकर जागा होती.

ती कमी पडत असल्याने पाठपुरावा करून संक्षण मंत्रालयाकडून एप्रिलमध्ये १६ एकर जागा मिळविली. आता कार्गो पार्किंग, कार्यालयीन व्यवस्था आणि निवासी संकुलासाठी आणखी ३५ एकर जागा मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री अरुण जेटली, नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.’’

विमानतळावर चेक इन काउंटरची संख्या वाढविली आहे. सिक्‍युरिटी चेक इनची प्रक्रियाही सुलभ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सुविधा निर्माण करीत आहोत, असे अजयकुमार यांनी सांगितले. विमानतळावरून २० नवी उड्डाणे सुरू करण्यासाठी वायुदलाकडे प्रस्ताव पाठविला आहे, असे त्यांनी सांगितले. 

विमानतळाला पाणी टॅंकरने 
विमानतळाला पाणी वाढवून द्यावे, अशी मागणी विमानतळ प्रशासन गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेकडे करीत आहे. तांत्रिक कारणामुळे पाणी उपलब्ध करून देत येत नसल्याचे महापालिका म्हणत आहे. विमानतळाला सध्या गरजेच्या ७० टक्केच पाणी मिळते. उर्वरित ३० टक्के पाण्यासाठी दररोज १५-२० टॅंकर आणावे लागतात. विमानतळ ज्या भागात आहे, तेथील नगरसेवकच सध्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. तरीही पाण्याचा प्रश्‍न सुटलेला नाही. 

विमानतळ आंतरराष्ट्रीय करा 
लोहगाव विमानतळ आंतरराष्ट्रीय म्हणून घोषित करावे, अशी मागणी मागणी प्रशासन गेल्या तीन वर्षांपासून भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे करीत आहे. त्याबाबत वेगाने पाठपुरावा सुरू आहे. विमानतळ आंतरराष्ट्रीय घोषित झाल्यावर परदेशातील विमान कंपन्यांच्या फेऱ्यांची संख्या पुण्यातून वाढू शकेल. तसेच त्यांची कार्यालयेही येथे सुरू होतील. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचे निकष पुण्याने पूर्ण केले आहेत, असे विमानतळ संचालक अजयकुमार यांनी सांगितले. पुरंदरचे नियोजित आणि लोहगावचे हे दोन्ही विमानतळ आंतरराष्ट्रीय होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुणे-बॅंकॉक थेट विमानसेवा येत्या मार्चपासून 
काम पूर्ण झाल्यावर दरवर्षी २ कोटी ५० प्रवासी सामावून 
घेता येणार
विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी लागणार ३०० एकर जागा 
विमानतळाच्या नव्या इमारतीत होणार - ५ एरोब्रिज, १५ लिफ्ट, ८ सरकते जिने, ३४ चेक-इन काउंटर, ४ अरायव्हल बेल्ट, तळमजल्यावर बॅगेज हॅंडलिंगसाठी ५ ठिकाणी सुविधा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com