Vidhan Sabha 2019 : पुण्यात पावणे तीन लाखांची 800 लीटर दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

पुणे : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर येरवडा पोलिसांकडून येरवडा येथील अवैध धंद्यावर रविवारी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 20 गुन्हे दाखल करण्यात आले असून पावणे तीन लाख रुपये किंमतीची 800 लीटर गावठी दारू व 1400 लीटर दारू बनविण्याचे रसायन जप्त करण्यात आले.
 
येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय वाघमारे यांच्या पथकाने येरवडा परिसरात चालणाऱ्या अवैध दारूधंदे विरुद्ध कारवाई केली. मुंबई प्रॉव्हिबिशन कायद्यान्वये 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईमध्ये पावणे तीन लाख रुपयांची 800 लिटर गावठी दारू, 1400 लिटर रसायन , दारू गाळण्यासाठी लागणारे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 800 liters of alcohol seized in Pune before Maharashtra Vidhan Sabha 2019