#PuneFlood ८० हजार प्रवाशांना फटका

shivajinagar
shivajinagar

स्वारगेट - मुसळधार पावसामुळे पुण्याहून मुंबईकडे किंवा कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीचीही दैना उडाली. तीन दिवसांत एसटी, रेल्वेच्या ८० हजार प्रवाशांना प्रवास रद्द करावा लागला. त्यामुळे एसटी आणि रेल्वेचे दीड कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

स्वारगेट  एसटी स्थानक 

  तीन दिवसांतील बंद गाड्या ः २७९ 
  उत्पन्नात घट ः ४८ लाख रुपये 
  प्रवाशांची घट ः १२ हजार २७६ 
  स्वारगेटवरून दररोज १७१ गाड्या सोडल्या जातात. त्यापैकी फक्त ७८ गाड्या चालू आहेत 
  कोल्हापूर, सांगली मार्गावरील प्रवासी गाड्या सुरू होण्याच्या आशेवर स्थानकावरच थांबले. 

पुणे  रेल्वे स्थानक

  पुणेमार्गे जाणाऱ्या रद्द गाड्या ः ३७ 
  फटका बसलेले प्रवासी ः ६२ हजार ९०० 
  रेल्वेचे नुकसान ः सुमारे ९० लाख रुपये  
  गेल्या तीन दिवसांपासून मुंबई मार्गावर एकही गाडी गेली नाही. 
  मुंबईहून दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या येत नसल्यामुळे गैरसोय.
  दक्षिणेकडून मुंबईकडे जाणारेही प्रवासी पुण्यात अडकले. 
   पुणे रेल्वे स्थानक प्रवाशांनी तुडुंब भरले. 


पुणे ते कोल्हापूर मार्गावरील गाडी पुरामुळे परत फिरवली. त्यामुळे सोमवारी सायंकाळपासून मी बस स्थानकावर बसून आहे. पावसामुळे प्रचंड त्रास झाला.
- अनिकेत भाईप, एसटी प्रवासी

रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना ८०० ते ९०० रुपये देऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. रेल्वेने पावसाळापूर्वी कामे पूर्ण केली असती, तर दरड कोसळण्यासारख्या घटना घडल्या नसत्या. 
- नागेश म्हात्रे, रेल्वे प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com