ससून रुग्णालयाला '80 जी'चे प्रमाणपत्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

पुणे - ससून रुग्णालयाला देणगी दिल्यास त्यातून देणगीदाराला कर सवलत मिळण्याचा रस्ता आता खुला झाला आहे, कारण ससून रुग्णालयाला प्राप्तिकर खात्याने "80 जी' हे प्रमाणपत्र दिले आहे. असे प्रमाणपत्र मिळणारे ससून हे राज्यातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, 'ससून रुग्णालयाला दिलेल्या देणगीमुळे देणगीदाराला कर सवलत मिळणार आहे, त्यासाठी ससून रुग्णालय देणगी समिती स्थापन केली आहे. अधिष्ठातांसह डॉ. रमेश भोसले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, वैद्यकीय समाज सेवक एम. बी. शेळके, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचा या देणगी समितीमध्ये समावेश केला आहे.''

ससून रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलत आहे. त्यात अनेकांनी हातभार लावला आहे. पण, देणगीदारांना त्यातून कर सवलत मिळत नव्हती, त्यामुळे रुग्णालयाला मिळालेले "80 जी' प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सनदी लेखापाल दीपक एखे आणि लक्ष्मीकांत शिंदे, तसेच डॉ. हरीश टाटिया, डॉ. नितीश अगरवाल, डॉ. अभिषेक रंजन यांनी पाठपुरावा केला. प्राप्तिकर खात्याचे आयुक्त एस. के. सिंग, उपायुक्त मिलिंद चाहुरे आणि नाईक यांनी यात योगदान दिले.

Web Title: 80g certificate to sasoon hospital