मुळशी तालुक्‍यात सरासरीच्या ८१ टक्के पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

पिरंगुट - मुळशी तालुक्‍यात या वर्षी पावसाने वार्षिक सरासरीच्या एक्‍याऐंशी टक्के, तर जुलैअखेरच्या सरासरीच्या एकशे चाळीस टक्के हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागला आहे.

तहसीलदार सचिन डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशीतील पावसाची वार्षिक सरासरी १५८५ मिलिमीटर असून, त्यापैकी या वर्षी मुळशीत आजअखेर १३०१ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा जुलैअखेर मुळशीत वार्षिक सरासरीच्या ८१ टक्के पाऊस झाला आहे. मुळशीतील जून व जुलैची पावसाची सरासरी ९१५ मिमी असून, मागील वर्षी जुलैअखेर १०३७ मिमी पाऊस पडला होता. त्यामुळे मुळशीत वार्षिक सरासरीच्या तुलनेने या वर्षी ८१ टक्के, तर जून व जुलैच्या सरासरीच्या १४० टक्के पाऊस झाला आहे. 

मुळशीत रविवारी झालेला पाऊस - मुठा - ३६ मिमी, पिरंगुट - २७ मिमी, पौड - २६ मिमी, थेरगाव - ७ मिमी, माले - ४५ मिमी व घोटावडे - ३२ मिमी.

Web Title: 81 percent of the average rainfall in Mulshi taluka