पुणे शहरात बेकायदा दस्तनोंदणीची ८३० प्रकरणे उघडकीस; दोन अधिकारी निलंबित

दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी योग्यरीत्या पार पाडली जाते किंवा नाही याची पाहणी राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देवून केली.
Stamp Duty
Stamp DutySakal

पुणे - शहरातील एकाच दुय्यम निबंधक कार्यालयात (दस्तनोंदणी कार्यालय) (Registration Office) ‘महारेरा’चा (Maharera) नोंदणी क्रमांक नसलेले १९५ तर तुकडाबंदीचे आदेश मोडून ६३५ अशा ८३० दस्तांची नोंदणी केल्याची धक्कादायक माहिती (Information) समोर आली आहे. त्यामुळे याप्रकरणी हवेली १४ (भोसरी) दस्त नोंदणी कार्यालयातील दुय्यम निबंधक आणि सह दुय्यम निबंधक यांना निलंबित केले आहे. (830 Cases of Illegal Registration Registered in Pune Two Officers Suspended)

दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी योग्यरीत्या पार पाडली जाते किंवा नाही याची पाहणी राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देवून केली. त्यामध्ये केलेल्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शहरातील २४ हून अधिक दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. त्यातील एकाच कार्यालयात एवढ्या मोठ्या संख्येने नियमांचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केल्याचे समोर आल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, एका प्रकरणात चुकीच्या पद्धतीने वर्गीकरण केल्यामुळे सरकारचे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचेही तपासणीत आढळून आले आहे.

Stamp Duty
आंबील ओढ्यालगत असणाऱ्या कॅल्व्हटचे (पूलाचे) काम कधी होणार? नागरिकांचा प्रश्न

राज्य सरकारने २०१६ मध्ये महारेराची स्थापना केली. महारेराच्या तरतुदीनुसार ५०० चौरस मीटरच्या आतील अथवा आठ सदनिकांच्या आतील प्रकल्पांना महारेराच्या प्रमाणपत्र नोंदणीतून वगळले आहे. मात्र त्यावरील प्रत्येक प्रकल्पाला महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. तोच नियम अशा प्रकल्पातील सदनिकांची विक्री करताना महारेराच्या नोंदणी क्रमांकाचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. असे असतानाही हवेली १४ दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दुय्यम निबंधकांनी जाणीवपूर्वक नियमांकडे दुर्लक्ष करून १९५ दस्तांची नोंदणी केली असल्याचे आढळून आले आहे. तसेच, तुकडाबंदी कायदा लागू असतानाही १० गुंठ्यांच्या आतील सुमारे ६३५ दस्तांची नोंदणी केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या कार्यालयातील दुय्यम निबंधक एल. ए. भोसले यांना निलंबित करण्याचे आदेश नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी काढले आहेत.

Stamp Duty
खासगी शाळेचे 25 टक्के शुल्क कपात, पुणे जिल्हा परिषदेत ठराव मंजूर

महारेरा आणि तुकडाबंदी संदर्भातील आदेशाचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केल्याबद्दलच्या प्रकरणात एका दुय्यम निबंधकाला निलंबित केले आहे, तर गैरहजर राहून कार्यालयात खासगी व्यक्तीच्या माध्यमातून दस्तनोंदणीचे काम सुरू असल्याचे तपासणीत निदर्शनास आल्यामुळे तेथील दुय्यम निबंधकालाही निलंबित करण्यात आले आहे.

- श्रावण हर्डीकर, नोंदणी महानिरीक्षक

खासगी व्यक्तींच्या हातात कारभार

दुय्यम निबंधक कार्यालयात वेळेवर हजर न होणे, कार्यालयात खासगी व्यक्तींच्या हातात कारभार देणे, दस्तनोंदणी सुरू करण्यासाठीचा ओटीपी खासगी व्यक्तीला देणे, दस्तांचे स्कॅनिंग न करणे असे धक्कादायक प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिल्यानंतर हवेली २२ (एरंडवणा) या कार्यालयांमध्ये आढळून आला. त्यांची गंभीर दखल घेत सह दुय्यम निबंधक ए. के. नंदकर यांनादेखील नोंदणी महानिरीक्षकांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. यावरून दस्तनोंदणी कार्यालयाचा कारभार खासगी व्यक्तींच्या मदतीने चालविला जात असल्याचे उघड झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com