पुणे जिल्ह्यात दिवसभरात 832 नवे कोरोनारुग्ण 

पुणे जिल्ह्यात दिवसभरात 832 नवे कोरोनारुग्ण 

पुणे - पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.22) दिवसभरात 832 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 369 जण आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 7130 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज 1530 कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 41 जणांचा मृत्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज पिंपरी चिंचवडमध्ये 182, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 204, नगरपालिका क्षेत्रात 65 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 12 नवे रुग्ण सापडले  आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 21 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 6, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 11 आणि नगरपालिका  क्षेत्रातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामुळे पुणे जिल्ह्यातील आज अखेरपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 17 हजार 608 झाली आहे. यापैकी 2 लाख 94 हजार 70 कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 1 लाख 46 हजार 912 जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील 82 हजार 510, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 46 हजार 262, नगरपालिका क्षेत्रातील 12 हजार 907 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील 5 हजार 479 जणांचा समावेश आहे. याशिवाय आतापर्यंत 7 हजार 600 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 324 जणांचा समावेश आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com