पीएमपी कामगारांना 8.33 टक्के बोनस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

णे - पीएमपीच्या 11 हजार कामगारांना 8.33 टक्के बोनस आणि 11 हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचे गुरुवारी वाटप झाले. त्यामुळे त्यांची दीपावली अखेर गोड झाली.

णे - पीएमपीच्या 11 हजार कामगारांना 8.33 टक्के बोनस आणि 11 हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचे गुरुवारी वाटप झाले. त्यामुळे त्यांची दीपावली अखेर गोड झाली.

बोनस आणि सानुग्रह अनुदानासाठी पीएमपी कामगार संघटनेने (इंटक) 14 ऑक्‍टोबरला धरणे आंदोलन केले होते. त्या वेळी प्रशासनाने पैसे वेळेत देण्याची ग्वाही दिली होती; परंतु आयुक्त परदेश दौऱ्यावर असल्यामुळे तांत्रिक अडचणी झाल्या होत्या. त्या दूर होऊन कर्मचाऱ्यांना गुरुवारी बोनस आणि सानुग्रह अनुदान मिळाल्याची माहिती इंटकचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, महासचिव नुरुद्दीन इनामदार यांनी दिली. कामगारांच्या निधीतून संघटनेच्या कोणत्याही रकमेची कपात झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. या प्रश्‍नासाठी पीएमपी कामगारांना साथ दिल्यामुळे संघटनेने महापालिकेचे पदाधिकारी आणि गटनेत्यांचे आभार मानले आहेत.

Web Title: 8.33% bonus for PMP employees

टॅग्स