Vidhan sabha 2019 : लोणीकंद पोलिस ठाण्यात तब्बल 85 जणांनी केली शस्त्रे जमा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

Vidhan sabha 2019 :  वाघोली : लोणीकंद पोलिस ठाणे अंतर्गत 88 जण परवाना शस्त्र वापरतात. त्यातील 85 शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने परवानाधारकांकडून त्यांची शस्त्र पोलिस ठाण्यात जमा करण्यात येतात.  

वाघोली : लोणीकंद पोलिस ठाणे अंतर्गत 88 जण परवाना शस्त्र वापरतात. त्यातील 85 शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने परवानाधारकांकडून त्यांची शस्त्र पोलिस ठाण्यात जमा करण्यात येतात.  

सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार आचारसंहिता सुरु असताना निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रांचा गैरवापर होवू नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परवाना धारकांना शस्त्रे जमा करणे आवश्यक असते. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ गावांमध्ये एकूण ८८ परवानाधारक शस्त्र असून यापैकी ८५ शस्त्रे जमा करण्यात आली असल्याचे लोणीकंद पोलिसांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 85 people surrendered weapons at Lonikand police station