
Baramati : बारामतीतील लोकअदालतीत 8562 प्रकरणे निकाली
बारामती : येथे नुकत्याच झालेल्या लोकन्यायालयात तब्बल 12 कोटी 66 लाख 33 हजार रुपयांची विक्रमी वसुली होऊन 8562 प्रकरणे निकाली निघाली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार बारामती न्यायालयामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालत झाले.
या लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेली मोटार वाहन नुकसान भरपाई, कौटुंबिक वादाची, वीज वितरण कंपनीची, दिवाणी, चेक बाऊन्सची अशी न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे ठेवलेली होती. बँक, वीज कंपनी, महानगरपालिका व ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टीची तसेच विविध वित्तीय संस्थाची व मोटार वाहन कायद्याअंतर्गत येणारी दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीकरीता ठेवण्यात आलेली होती.
सदर लोकन्यायालयात एकूण 8562 प्रकरणे निकाली निघाली. सदर तडजोडीत 12 कोटी 66 लाख 33 हजार इतकी विक्रमी रक्कम वसूल झाली. सदरील लोकन्यायालयात न्यायिक अधिकारी,बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष उमेश काळे व सर्व पदाधिकारी,न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले.