इंदापूर तालुक्यासाठी ९ कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर

praveen-mane
praveen-mane

वालचंदनगर - पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यातील ६१ गावातील दलित वस्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी ९ कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबत झेडपी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी माहिती दिली.

झेडपीचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते व समाजकल्याण विभागाच्या सभापती सुरेखा चौरे यांच्या सहकार्याने इंदापूर तालुक्यातील ६१ गावामध्ये १५९ ठिकाणी दलित वस्तीमधील बंदिस्त गटार योजना, अंतर्गत रस्‍ते दुरुस्ती, रस्त्याचे डांबरीकरण व कॉक्रिटीकरण करणे, नळपाणीपुरवठा योजना सुरु करणे, पाण्याची टाकी, समाजमंदिर बांधण्यासाठी ९ कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे माने यांनी सांगितले.

तालुक्यातील निधी मंजूर झालेल्या गावांची नावे व कंसात निधी खालीलप्रमाणे : 
काटी (२१लाख), वडापुरी (१७लाख), कांदलगाव (११लाख), शेळगाव (१४लाख ७१हजार), वालचंदनगर (२०लाख), कळंब (१कोटी २०लाख), तावशी (५लाख), लासुर्णे (१०लाख), सणसर (६६लाख), पवारवाडी (५लाख १८हजार), घोरपडवाडी (६लाख), निर-निमगाव (१२लाख), रुई (१५लाख), पळसदेव (१०लाख), बिजवडी (१०लाख), भिगवण (१५लाख), भावडी (१२लाख), पोंधवडी (१३लाख), गलांडवाडी (१२लाख), निमगाव-केतकी (१२लाख), भोडणी (८लाख), बावडा (७१लाख ६०हजार), अगोती नं.१ (१४लाख), अंथूर्णे (३०लाख), कालठन नं.२ (२६लाख), बोरी (१५लाख), कुंभारगाव (१०लाख), कचरवाडी (३लाख), शेटफळगडे (२लाख), बाभूळगाव (८लाख), रणगाव (११लाख), तक्रारवाडी (१३लाख), निमसाखर (३७लाख), भांडगाव (१०लाख), रेडणी (१७लाख ६६ हजार), नरसिंहपूर (१२लाख), शिरसटवाडी (२लाख), निरवांगी (८लाख), गोतोंडी (१०लाख), जंक्शन (८लाख), कळस (८लाख), गोंदी (५लाख), शहा (५लाख), खोरोची (८लाख ६०हजार), वरकुटे खुर्द (३५लाख २०हजार), डाळज नं.३ (२लाख), हिंगणगाव (८लाख), न्हावी (११लाख), चाकाटी (२लाख ६६हजार), बळपुडी (२लाख), डिकसळ (५लाख), लाकडी (१५लाख), म्हसोबाचीवाडी (१०लाख), अजोती (९लाख), लोणी देवकर (३लाख), डाळज (४लाख), पिंप्री खुर्द (५लाख), कुरवली (१९लाख ८१हजार), पडस्थळ (३लाख), मदनवाडी (७लाख ८०हजार) व काझड (१५लाख) या गावांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com