नऊ कोटींच्या औषध खरेदीला स्थायी समितीची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पुणे - महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी सुमारे 9 कोटी 14 लाख रुपयांची औषध खरेदी करण्यात येणार आहे. त्याकरिता कमी दराने आलेली निविदा स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजूर करण्यात आली. त्यात "ब्रॅण्डेड' आणि "जेनेरिक' औषधांचा समावेश असल्याचे समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी महापालिकेतर्फे अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना राबविण्यात येते. त्याअंतर्गत रुग्णांना औषधे आणि इतर साहित्य देण्याची सोय आहे. या औषध खरेदीसाठी महापालिकेच्या आरोग्य खात्याने मागविलेल्या निविदा पाच औषध विक्रेत्यांनी भरल्या होत्या. त्यापैकी नरेंद्र मेडिकल्स यांनी "ब्रॅण्डेड औषधे आणि इतर साहित्याच्या छापील किमतीवर 23 टक्के, तर, "जेनेरिक' औषधे व इतर साहित्याच्या छापील किमतीवर 51 टक्के इतकी सवलत देण्याचे निविदेत म्हटले आहे. त्यानुसार पाच कोटी रुपयांपर्यंतच्या औषधांची खरेदी करण्यात येणार असून, त्याबाबतच्या कराराचा प्रस्ताव स्थायीने मंजूर केला.

शिवाय, परवानाधारक विक्रेत्यांकडून अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजनेकरिता दैनंदिन स्वरूपात औषधे आणि इतरही साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. त्यातून चार कोटी 14 लाख रुपयांपर्यंत औषधे खरेदी करण्यात येतील, असे मुळीक यांनी सांगितले.

Web Title: 9 crore rupees medicine purchasing permission