पुण्यात पाईपलाईन फुटली; भिंत कोसळल्याने 9 जण जखमी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

जनता वसाहत येथील गल्ली नंबर 29 येथे रात्री सव्वा अकराच्या सुमारास पंपिंग स्टेशनची 18 इंची व्यासाची पाण्याची पाईपलाईन फुटली. या भागातील महादेव लोखंडे यांच्या घरातीलही पाईपलाईन फुटली. भिंतीतून पाणी यायला लागले, घर हादरायला लागले, त्यावेळी घरातील सर्व सदस्य बाहेर आले. आजूबाजूचे नागरिक देखील बाहेर आलेत

पुणे : सिंहगड रस्ता येथील जनता वसाहत गल्ली नंबर 29 येथे 18 इंची पाण्याची पाईपलाईन फुटली असून त्यामध्ये नऊ लोक जखमी झाले आहेत. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार केले असून त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले

याबाबत अधिक माहिती अशी की, जनता वसाहत येथील गल्ली नंबर 29 येथे रात्री सव्वा अकराच्या सुमारास पंपिंग स्टेशनची 18 इंची व्यासाची पाण्याची पाईपलाईन फुटली. या भागातील महादेव लोखंडे यांच्या घरातीलही पाईपलाईन फुटली. भिंतीतून पाणी यायला लागले, घर हादरायला लागले, त्यावेळी घरातील सर्व सदस्य बाहेर आले. आजूबाजूचे नागरिक देखील बाहेर आलेत

.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, ''या ठिकाणची एक भिंत पडल्याने नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.''


दहा हजार कोरोनामुक्त; आठवडाभरातील आकडेवारीने पुणेकरांना दिलासा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 injured in wall collapse due to pipeline ruptures in Pune