बावधनमधील `त्या` हाॅटेल चालकाच्या संपर्कातील 9 जणांचे रिपोर्ट...

corona nigative.JPG
corona nigative.JPG

बावधन (पुणे) : येथील कोरोना बाधित हॉटेल चालकाच्या संपर्कातील 9 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर उर्वरीत एका व्यक्तिच्या अहवालाची अद्याप प्रतिक्षा असल्याचे नगरसेवक किरण दगडे यांनी सांगितले. त्यामुळे बावधनकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

बाधवन येथील 24 मेला हॉटेलचालक कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. या हाॅटेल चालकांकडून अनेकांनी पार्सल डबे घेतले होते. तर दिवसभर चहा पिणे, सिगारेट ओढण्यासाठी येथे गर्दी होत होती. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. या परिसरात प्रशासन व ग्रामपंचायतकडून खबरदारी घेऊन त्याच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करून हा भाग सिल करण्यात आला.

कोरोना बाधित हाॅटेल चालकाच्या संपर्कातील दहा जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका अहवालाची प्रतिक्षा आहे. तथापि बावधन ग्रामपंचायत व महानगरपालिका प्रशासनाकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येक घराठिकाणी सोडीयम हायपोक्लोराईड औषधाची फवारणी करण्यात येत आहे.  

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

याबाबत सरपंच पियुषा दगडे यांनी सांगितले की प्रत्येक नागरिकांना आपल्या स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, त्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळावे, हॅंड सॅनिटायझर तसेच हॅंड वॉश वापरून हात स्वच्छ करत रहावे. ग्रामपंचायतकडून सर्व ते सहकार्य नागरिकांना केले जाणार असून बावधनमध्ये कोरोनाला रोखण्यास शर्थीचे प्रयत्न करणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com