esakal | धक्कादायक! जमाव हल्ल्यात ९ पोलिस जखमी; बारामती येथील घटना!
sakal

बोलून बातमी शोधा

Police

जळोची परिसरामध्ये वातावरण शांत असून या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी पाचारण करण्यात आली आहे.

धक्कादायक! जमाव हल्ल्यात ९ पोलिस जखमी; बारामती येथील घटना!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : होम क्वॉरंटाईन असलेल्या लोकांना बाहेर फिरू देऊ नये, असे सांगणाऱ्या युवकाला काही जणांनी मारहाण केली. त्यानंतर तेथे गेलेल्या पोलिस पथकावर बारामती शहरातील काही जणांनी जोरदार हल्ला चढवला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याच्यामध्ये पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह तीन अधिकारी आणि सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. अनेकांच्या हाताला जोरदार मार लागला असून काहींच्या डोक्यात काठ्या घालण्यात आल्या आहेत, तर काहीजणांना दगडाने देखील मारहाण करण्यात आली आहे.

शुक्रवारी (ता.२७) दुपारी चारच्या सुमारास बारामती शहरातील जळोची येथे ही घटना घडली. जखमी पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर बारामतीच्या सिल्वर ज्युबली रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

- धक्कादायक ! ३६ वर्षीय तमिळ अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन

पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे, फौजदार पद्मराज गंपले आणि योगेश शेलार, पोलीस कर्मचारी पोपट कोकाटे, सिद्धेश पाटील , पोपट नाळे, महिला पोलीस कर्मचारी रचना काळे आणि स्वाती काजळे असे एकूण नऊ जण या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

- Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

जळोची परिसरामध्ये वातावरण शांत असून या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी पाचारण करण्यात आली आहे. एका कुटुंबातील एक वयोवृद्ध महिला पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडली, असा बनाव करून मारहाण करणारे महिला पोलिसांच्या अंगावर चाल करून आले आणि पोलिसांच्या हातातील काठ्या हिसकावून घेत त्यांनी पोलिसांना मारहाण केली. यावेळी तेथील युवकांनी पोलिसांवर दगडफेकही केली. अनेक पोलिसांना दगडांचा मुक्कामार देखील लागला आहे.

- राजेश टोपे यांनी सांगितला कोरोना प्रतिबंधाचा फॉर्म्युला; काय आहे '3T' फॉर्म्युला

loading image