पुणे- 90 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 535, सदस्यपदासाठी 2365 अर्ज वैध

संतोष आटोळे
मंगळवार, 15 मे 2018

शिर्सुफळ (पुणे) : जिल्ह्यातील जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या एकुण 90 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकुण सरपंचपदासाठी 539 तर सदस्य पदासाठी 2493 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये झालेल्या छाननीअंती सरपंचपदासाठी 535 व सदस्य पदासाठी 2365 अर्ज वैध ठरले आहेत.

शिर्सुफळ (पुणे) : जिल्ह्यातील जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या एकुण 90 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकुण सरपंचपदासाठी 539 तर सदस्य पदासाठी 2493 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये झालेल्या छाननीअंती सरपंचपदासाठी 535 व सदस्य पदासाठी 2365 अर्ज वैध ठरले आहेत.

तर सात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये खेड व भोर तालुक्यातील ग्रामपंचायतीची जागा वगळता उर्वरित वेल्हे तालुक्यातील दोन, भोर जुन्नर व आंबेगाव मधिल एका जागेच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी यावेळीही एकही अर्ज दाखल झाला नाही. यामुळे यावेळेही या जागा रिक्तच राहणार आहेत. दरम्यन बुधवारी (ता.16) अर्ज माघारीचा दिवस आहे.त्यानंतरच निवडणुकींच्या लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींच्या सरपंच तसेच सदस्य पदासाठी अर्ज छाननी नंतर सरपंच पदासाठी 535 उमेदवारांनी  व सदस्य पदासाठी 2344 उमेदवारांनी 2365 अर्ज वैध ठरले आहेत. तर पोटनिवडणुकांमध्ये सात गावांच्या सरपंचपदापैकी फक्त दोनच गावात प्रत्येकी एकच अर्ज वैध झाले आहेत. यामुळे त्यांची बिनविरोध निवड होणार आहे.तर पाच गावांतील सरपंच पद पुन्हा रिक्तच राहणार आहे. तर सदस्य पदासाठी 258 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी फक्त 142 अर्जच दाखल झाले आहेत. यामुळे सदस्य पदाच्या अनेक जागा पुन्हा रिक्तच राहणार आहेत.

तालुका, निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायत संख्या, सरपंच पदासाठी दाखल अर्ज संख्या, सदस्य पदासाठी दाखल अर्ज संख्या खालील प्रमाणे.. 
वेल्हा - 1 - 6 - 10
मावळ - 7 - 33 - 156 
भोर - 6 - 13 - 38
जुन्नर - 3 - 44 - 126
मुळशी - 1 - 3 - 11   
पुरंदर - 13 - 99 - 371 
खेड - 13 - 57 - 204
आंबेगाव - 10 - 50 - 213  
बारामती - 15 - 73 - 373  
शिरुर - 6 - 47 - 252
इंदापूर - 5 - 36 - 184
दौंड - 10 - 74 - 427
एकुण - 90 - 535 - 2365 

Web Title: for 90 grampanchayat 535 forms for sarpanch and 2365 dor members are valid