पुणे : स्मृतीभ्रंश झालेल्या महिलेला मिळणार 90 लाख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

पुणे : अपघातानंतर स्मृतीभ्रंश झालेल्या एचआर व्यवस्थापकास 90 लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. शनिवारी झालेल्या लोकअदालतमध्ये जिल्हा न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांच्या पॅनेलसमोर हा निर्णय झाला.

पुणे : अपघातानंतर स्मृतीभ्रंश झालेल्या एचआर व्यवस्थापकास 90 लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. शनिवारी झालेल्या लोकअदालतमध्ये जिल्हा न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांच्या पॅनेलसमोर हा निर्णय झाला. 

सिमी शशिधरण पाणीकर (वय 41, रा. जुनी सांगवी) असे व्यवस्थापकाचे नाव आहे. त्यांनी ऍड. एन. डी. वाशिंबेकर यांच्यामार्फत आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीच्या विरोधात येथील मोटार अपघात न्याय प्राधिकरणात 2017 मध्ये दावा दाखल केला होता. सिमी या हिंजवडी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये एचआर व्यवस्थापक म्हणून कामाला होत्या. त्यांना दरमहा 88 हजार रुपये पगार होता. 

4 जून 2016 ला पहाटे ओला इंडिका कारमधून विमानतळाकडे जात होत्या होत्या. त्यांची कार जगताप डेअरीजवळील आल्यानंतर समोरून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात सिमी या जखमी झाल्या. त्यांच्या डोक्‍याला जबर मार लागला. स्मृतीभ्रंश आणि मानसिक त्रासाला त्यांना सामोरे जावे लागले व 80 टक्के कायमचे अपंगत्व आले. त्यामुळे गाडीचा मालक आणि विमा कंपनीच्या विरोधात खटला दाखल करून 3 कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती. विमा कंपनीचे वकील हृषिकेश गानू यांनी तडजोडीत महत्त्वाची भूमिका बजावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 90 lakh compensation to the HR manager for Accident in pune