हवेली तालुका हजाराच्या उंबरठ्यावर...

corona update.jpg
corona update.jpg

खडकवासला (पुणे) : हवेली तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दररोज किमान ५० रुग्ण वाढत आहेत. तालुक्यात ६३रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर तालुक्यात सोमवार अखेर रुग्ण संख्या ९१८ वर पोचली आहे. हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात म्हणाले, तालुक्यात पुणे व पिंपरी चिंचवड शहरालगत आहे. येथे दाट लोकवस्ती आहे. त्यातील अनेक जण दोन्ही शहरात कामानिमित्त बाहेर पडत आहेत. तर अनेकजण या परिसरात कामानिमित्त येत आहेत. नऱ्हे, कोंढवे- धावडे, खानापूर, नांदेड, खडकवासला, वाघोली, पिसोळी, मांजरी, लोणी काळभोर औतडे हांडेवाडी, कात्रज परिसरातील वाड्या येथे ही रुग्ण संख्या वाढत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खरात यांनी सांगितले की, तालुक्यात दिवसभरात ६३ नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत ९१८ जणांना लागण झाली आहे. त्यातील १६ जणांचा मृत्यू झाला आहे. ३८३ जण बरे झाले आहेत. तर ५१९ जणांवर उपचार सुरू आहे. यातील तिघेजण गंभीर आजारी आहेत. मांजरी, वडकी येथील दोघांचा मृत्यू झाला.

काल पॉझिटिव्ह सापडलेले रुग्ण ६3
आव्हाळवाडी १, गोऱ्हे खुर्द १, केसनंद ४, खडकवासला ४, किरकटवाडी १, वडकी ४,
नांदेड 3, नऱ्हे २, खानापूर २, मालखेड १, वरदाडे १, मांजरी बुद्रुक २०, लोणी काळभोर ३, पेरणे १, कोंढवे धावडे ७, वळती १, उरुळी कांचन १, पिंपरी सांडस १,
निरगुडी १, वाघोली ५.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com