प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर 92 वर्षांच्या आजींनी केली कोरोनावर मात

yashodabai kumbhar.jpg
yashodabai kumbhar.jpg

रामवाडी (पुणे) : प्रबळ इच्छाशक्तीच्या जोडीला सकारात्मक विचार आणि चांगली प्रतिकार शक्ती असेल तर कोणत्या ही वयात रोगाविरुद्ध लढता येते हे 92 वर्षाच्या आजींनी दाखवून दिले. कोरोना झाल्यावर घरात थांबून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आजींनी कोरोनाला हरवले. लोहगाव येथील कुंभार वाडा परिसरात राहणाऱ्या  यशोदाबाई सखाराम कुंभार (वय 92)  या आजींच्या घरी नातवाचे लग्न होते. लग्नात मोजके नातेवाईक उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लग्न झाल्यानंतर नवरदेव मुलगा एका खालगी रुग्णालयात कामास रूजू झाले. आठ दिवसाने त्या हॉस्पिटल मधील स्टाफची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. त्यात त्या नवरदेवाचा रिपोर्ट् पॉझिटव्ह आला होता. त्यामुळे घरातील सतरा जणांची  कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यात आजी सह सहा जणांना लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर  यशस्वीपणे मात केली. सर्व सोयीने उपलब्ध असलेल्या घरातील एका खोलीमध्ये आजींना स्वतंत्र ठेवून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेऊन आजी ठणठणीत झाल्या आहेत. सध्या त्या आपले दैनंदिन जीवन आनंदाने जगत आहेत.


आजींवर घरी उपचार सुरु होते. मी दिवसभरात वेळ काढून मोबाईल वरून आजींची आरोग्य विषयी चौकशी करत होते. कशा प्रकारे तुम्ही काळजी घ्यावी हे सांगत होते. आजींनी ही दिलेल्या सूचनांचे पालन काटेकोरपणे केल्यामुळे  त्या कोरोना विरुध्दचा लढा जिंकल्या.

- ललिता तमनर, आरोग्य निरीक्षक, नगररोड क्षेत्रीय कार्यालय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com