खरीप पिकासाठी ९३६ कोटींचे कर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

जिल्ह्यातील १ लाख २३ हजार ५४३ शेतकऱ्यांना लाभ
पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्यावतीने (पीडीसीसी) खरीप हंगामातील पिकांसाठी आजअखेर (ता. ११) जिल्ह्यातील १ लाख २३ हजार ५४३ शेतकऱ्यांना ९३६ कोटी ३७ लाख १६ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. वाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ५५.१३ टक्के आहे. यंदाचे उद्दिष्ट एक हजार ६९८ कोटी ४२ लाख ७६ हजार रुपयांचे आहे. 

जिल्ह्यात सर्वाधिक १६७ कोटी ६३ लाख ९ हजार रुपयांचे कर्जवाटप जुन्नर तालुक्‍यात झाले आहे. सर्वांत कमी म्हणजे केवळ सहा कोटी ९७ लाख ६६ हजार रुपयांचे वाटप वेल्हे तालुक्‍यात झाले आहे, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली.  

ते म्हणाले, ‘‘गतवर्षी याच तारखेअखेर ९२९ कोटी ३६ लाख ७६ हजार रुपयांचे कर्जवाटप पूर्ण झाले होते. यंदा त्यात सुमारे सात कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. गतवर्षीचे उद्दिष्ट यंदापेक्षा कमी होते. त्यामुळे गेल्या वर्षीची कर्जवाटपाची टक्केवारी तत्कालीन उद्दिष्टाच्या ६० टक्के झाली होती. यंदाची टक्केवारी मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी दिसत आहे. प्रत्यक्षात वाटप यंदा जास्त झाले आहे.’’ दरम्यान, पीक कर्जाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मात्र यंदा घट झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ७२९ शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीक कर्जाचा लाभ घेतला होता. यंदा त्यात ९ हजार १८६ ने घट झाली आहे.

सर्व पात्र शेतकऱ्यांना येत्या ३० सप्टेंबरअखेर कर्जवाटप केले जाणार आहे. यंदा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांचे मिळून कर्जवाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. त्यात नक्कीच यश येईल. 
- रमेश थोरात, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक

Web Title: 936 crore loan for Kharip crop