इंदापुरात दलित वस्त्यांसाठी 9.50 कोटींचा निधी मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

भवानीनगर : डॉ. आंबेडकरांचा विचार बरोबर घेऊनच इंदापूर तालुक्‍याचा विकास सुरू आहे. तालुक्‍यात दलित वस्त्यांसाठी सर्वाधिक 9.50 कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सणसर येथे जयंती उत्सव कार्यक्रमात दिली. 

सणसरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बौद्ध विहारासमोरील व्यासपीठावर झालेल्या कार्यक्रमात भरणे बोलत होते. या वेळी सरपंच संध्या काळे, उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, छत्रपती कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर, प्रदीप निंबाळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी तसेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल चव्हाण, शरद चव्हाण, अतुल सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांसह पोलिस पाटील राजेंद्र चव्हाण उपस्थित होते. अण्णा ढमे व रवींद्र खवळे यांनी सूत्रसंचालन केले. 

सणसरसाठी सर्वाधिक निधी 
आंबेडकर जयंती कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी सणसरमध्ये सर्वाधिक 73 लाखांचा निधी जिल्हा परिषदेतून दिला असल्याची माहिती दिली. 

Web Title: 9.5 Cr fund allotted for Dalit community houses in Indapur