Vidhan Sabha 2019 : 96 व्या वर्षी त्यांनी बजावला मतदानाचा हक्क! (Video)

Walchand-Sanghavi
Walchand-Sanghavi

बारामती : वय वर्षे अवघे फक्त 96... स्वतः चारचाकी गाडी चालवत घरापासून मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावणाऱ्या बारामतीच्या वालचंद नानचंद संघवी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वालचंद संघवी यांनी म.ए.सो. विद्यालयातील मतदान केंद्रावर हजेरी लावली. 96 वर्षांचे वय असूनही हातात काठी न घेता स्वतः गाडी चालवत ते मतदान केंद्रावर पोहोचले आणि बूथपर्यंत चालत जात त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

एकच वेळ आहार घेणे, कोणतेही व्यसन न करणे, वेळच्या वेळी जेवण करणे हे आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे वालचंद्र संघवी यांनी सांगितले. सन 1950 पासून ते मतदान करीत आहेत. त्यावेळेच्या मतदानात आणि आजच्या मतदानात फारसा फरक वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.

बारामती तसेच राज्याचा विकास करणाऱ्या पक्षासोबतच आपण कायम होतो आणि यापुढील काळातही राहू, असे सांगत त्यांनी बारामतीच्या लोकप्रतिनिधीविषयी समाधान व्यक्त केले. बारामतीचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय संघवी यांचे ते वडील असून याप्रसंगी संजय संघ देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com