इंदापूर तालुक्यातील शाळांच्या दुरुस्तीसाठी ९७ लाखांचा निधी

राजकुमार थोरात 
बुधवार, 28 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३५ प्राथमिक शाळा दुरुस्ती करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या फंडातुन ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती झेडपी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्याच्या दुरावस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी इंदापूर तालुक्यातील झेडपीच्या ३५ शाळासांठी ९७ लाख रुपयायांचा निधी मंजूर केला आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे पाटील यांच्या सहकार्यने निधी मंजूर झाल्याची माहिती प्रवीण माने यांनी दिली असून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व   आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या सहकार्याने तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.

मंजूर झालेल्या शाळांची नावे व रक्कम पुढील प्रमाणे : इंदापूर शहरातील प्राथमिक शाळा क्रंमाक - १ दहा लाख रुपये,खोरोची ,बावडा व बिजवडी प्राथमिक शाळेसाठी प्रत्येकी पाच  लाख रुपये, ठाकुरवाडी शाळेसाठी साडेचार लाख रुपये,नरुटेवाडी व कालठण नंबर ४ शाळेसाठी प्रत्येकी चार लाख रुपये, माळवाडी नंबर - १ शाळेसाठी साडेतीन  लाख रुपये, वडापुरीतील हनुमानवाडी, पणधरवाडी, मदनवाडी,निरवांगीतील मानेवस्ती,लासुर्णेतील प्राथमिक शाळेसाठी प्रत्येक तीन लाख रुपये, अजोतीच्या शाळेसाठी अडीच लाख रुपये, माळवाडीजवळील सातपुेते येथील शाळेसाठी दोन लाख तीस हजार रुपये, राजवडी शाळेसाठी दोन लाख वीस हजार रुपये, रणगाव, कळंब, गोखळी,सराफवाडी, काळेवाडी नंबर - १ मधील म्हेत्रेवस्तीवरील शाळा, विरवाडी नंबर - २, शेळगाव मधील माळेवस्ती, लासुर्णे जवळील आठदारे, तावशी मधील मंडलीकवस्ती, बेलवाडीमधील जामदारवस्ती, मानकरवाडी, कांदलगाव मधील राखुंडेमळ येथील शाळेसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये, बोरी मधील झगडेवस्ती, वाघमोडेवस्ती, भरणेवाडीतील धापटेवस्ती, कळस, कांदलगावमधील शिंगाडेवस्ती, बाभुळगाव गावठाण शाळेसाठी प्रत्येकी दीड लाख व बोरीमधील भिसेवस्ती प्राथमिक शाळेसाठी एक लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती  माने यांनी दिली.

Web Title: 97 lakhs funds for the repair of schools in Indapur taluka