थेरगाव विभागामध्ये करदात्यांकडून 99 कोटी रुपयांचा भरणा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पिंपरी - महापालिकेच्या तिजोरीत गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराचा सर्वाधिक भरणा थेरगाव विभागाने केला. या विभागातील करदात्यांनी 99 कोटी 73 लाख रुपये भरले. महापालिकेने 2017-18 या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी 421 कोटी आठ लाख रुपये जमा केले. 

पिंपरी - महापालिकेच्या तिजोरीत गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराचा सर्वाधिक भरणा थेरगाव विभागाने केला. या विभागातील करदात्यांनी 99 कोटी 73 लाख रुपये भरले. महापालिकेने 2017-18 या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी 421 कोटी आठ लाख रुपये जमा केले. 

शहराची लोकसंख्या 22 लाख झाली असून, विकासकामे झालेल्या थेरगाव विभागात त्यांची वस्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. जेएनएनयुआरएमअंतर्गत झालेली विकासकामे, मोठ्या रुंदीचे रस्ते, उड्डाणपूल या पायाभूत सुविधा वाढल्यामुळे नवीन वस्ती वाढली. लोकांची मागणी वाढल्यामुळे नवीन निवासी इमारतींची संख्या वाढू लागली आहे. शहरात चार लाख 83 हजार 526 मालमत्ता आहेत. त्यापैकी थेरगाव विभागात 84 हजार 704 निवासी आणि पाच हजार 383 बिगरनिवासी मालमत्ता आहेत. 

कर भरणा करण्यासाठी महापालिकेने 16 करआकारणी विभागीय कार्यालये सुरू केली आहेत. "ऑनलाइन' कर भरण्याचीही सुविधा आहे. 

अन्य विभागातील आकडेवारी 
सांगवी : 43.44 कोटी, भोसरी : 32.43 कोटी, पिंपरी - वाघेरे : 31. 22 कोटी, 
चिंचवड : 29. 70 कोटी, आकुर्डी : 27.52 कोटी, महापालिका भवन : 27.03 कोटी, चिखली : 25.68 कोटी 

ऑनलाइन 145 कोटी संकलित 
महापालिकेकडे आर्थिक वर्षाअखेरीला ऑनलाइन पद्धतीने 145.25 कोटी रुपयांचा कर संकलित झाला. एक लाख 24 हजार 592 म्हणजेच 34.61 टक्के नागरिकांनी या पद्धतीने कर भरला. महापालिकेने "ऑनलाइन' मालमत्ताकर भरणा सुविधा सात वर्षांपूर्वी सुरू केली. त्याला आता नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवीन आर्थिक वर्षात "पेटीएम'द्वारेही कर भरण्याची सोय केली आहे.

Web Title: 99 crores from taxpayers in Thergaon division PCMC

टॅग्स