जुन्नरमध्ये बेवारस अवस्थेत पडलेल्या कोविड रूग्णाला मदतीचा हात

जुन्नरमध्ये बेवारस अवस्थेत पडलेल्या कोविड रूग्णाला मदतीचा हात

जुन्नर : कोरोनाचं संकट सध्या देशात घोंघावत आहे. पुणे जिल्हा कोरोना प्रादुर्भावाने सर्वाधिक ग्रासलेल्या जिल्ह्यांपैकी आघाडीचा जिल्हा आहे. या परिस्थितीत मन विदीर्ण करणाऱ्या अनेक घटना आजूबाजूला घडताना दिसत आहे. त्यातीलच ही घटना जुन्नरची! झोपडपट्टीत एकाकी राहणाऱ्या कोविड पॉझिटिव्ह रुग्ण महिलेची विचारपूस न करता तिला बेवारस टाकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुन्नर येथील पंचलिग झोपडपट्टीमध्ये ही महिला एकटीच राहत होती. कोविडची प्राथमिक लक्षणे दिसल्याने तिने तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला होता.

जुन्नरमध्ये बेवारस अवस्थेत पडलेल्या कोविड रूग्णाला मदतीचा हात
पुणे : संध्याकाळ आणि पाऊस; समीकरण आजही कायम

घरी आल्यानंतर तिची तब्येत अधिक खालावली. शेजारी राहणाऱ्यांनी तिची विचारपूस करणे गरजेचे असताना त्या महिलेला जवळच्या खड्यात उघड्यावर ढकलून दिल्याचे सांगितले जात आहे. जुन्नर नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष दिपेश परदेशी यांना हा प्रकार समजताच त्यांनी सहकारी नवनाथ नेटके यांचे समवेत येथे येऊन तिला धीर दिला. सहकाऱ्यांच्या मदतीने तिला उचलून स्ट्रेचरवर ठेऊन जुन्नर नगर पालिकेच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com