esakal | हडपसर येथील ऍक्युरेट गेजिंग' च्या विभागाने बनविला फिरता ऑक्सिजन प्लांट
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

हडपसर येथील ऍक्युरेट गेजिंग' च्या विभागाने बनविला फिरता ऑक्सिजन प्लांट

sakal_logo
By
कृष्णकांत कोबल

हडपसर : कोरोना (Corona) संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक रूग्णांना थेट रूग्णालयातही ऑक्सिजन न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. त्याची गरज लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी ऑक्सिजन (Oxegen) प्लांट सुरू केले आहेत. मात्र, हडपसर औद्योगिक वसाहतीमधील हायटेक कंपनी "ऍक्युरेट गेजिंग' च्या एजिमेड या विभागाने एक पाऊल पुढे टाकत "प्राणवायुदूत' या नावाने थेट मोबाइल ऑक्सिजन प्लांट बनविला आहे. हा सर्वात प्रगत आणि देशातील एकमेव पहिला मोबाइल ऑक्सिजन प्लांट असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कोरोना महामारीत व आपत्तीच्या वेळेत फिरता मोबाईल ऑक्सिजन प्लांट हा लोकांचे जीव वाचवण्यात अधिक उपयुक्त असणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील रुग्णालयासह आपत्तीजनक भागात याचा चांगला फायदा होऊ शकतो, असे अभियंत्याकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनाचा धोका आजूनही टळलेला नाही. तिसरी लाट येणार असल्याचे संकेत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे रुग्णालयांसह जिल्हा व राज्य प्रशासन ऑक्सिजन प्लांट उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. छोट्या मोठ्या हॉस्पिटलला ऑक्सिजन प्लांट तातडीने मिळावा, यासाठी ऍक्युरेट गेजिंगच्या एजिमेड या विभागाने फिरता मोबाइल ऑक्सिजन प्लांट बनवला आहे. या ऑक्सिजन प्लांट बाबतची माहिती कंपनीने प्रात्यक्षिकासह राज्यसरकारला दिली असून सरकारकडून त्याचे कौतकही करण्यात आले आहे.

हेही वाचा: महानगर गँस कंपनीकडून माणकीवली ग्रामपंचायतीत आरो वॉटर फिल्टरेशन प्लांट.

हा प्राणवायुदूत प्लांट प्रति मिनिट २५० लीटर ऑक्सिजन तयार करीत आहे. जिल्हा आरोग्य केंद्रे, ग्रामीण भाग आणि आपत्ती झोनमधील २० ते ५० खाटांच्या इस्पितळांची आपतकालीन गरज पूर्ण करण्यास सक्षम आहे. याची मांडणी करणे अतिशय सोपे असून अर्ध्या तासाच्या आत सेवा देण्यास तो सज्ज होतो. अत्याधुनिक स्थान किंवा जी.पी.एस. ट्रॅकिंग आणि रियल टाइम (आय.ओ.टी.) मॉनिटरिंग मुळे हा सर्वात प्रगत आणि एकमेव मोबाइल ऑक्सिजन प्लांट ठरला आहे. शहर व ग्रामीण भागात कोणत्याही शासकीय रुग्णालयात ही यंत्रणा उभारता येऊ शकते. अग्निशमन दलाच्या साहाय्याने ३० ते ५० किलोमीटरच्या टप्प्यातील रुग्णालयांच्या आपात्कालीन परिस्थितीत गरजेनुसार तो हलविताही येतो.

हेही वाचा: ‘न्हाई’ने २७ दिवसांत उभारला ऑक्सिजननिर्मिती प्लांट

"एजीमेड ही एक आय एस ओ ९००१ आणि १३४८५ प्रमाणित कंपनी आहे. ही वैयक्तिक वापरासाठी एच एफ एन ओ, सीपॅप, बायपॅप, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सारखी विविध प्रकारची जागतिक स्तरीय वैद्यकीय उपकरणे तयार करते. "प्राणवायुदूत' फिरता प्लांट ही पूर्णतः नवीन व प्रभावी संकल्पना आहे. एका आयशर टेम्पोमध्ये यंत्रसामुग्री ठेवून सहजरित्या ने-आण होऊ शकते. एखाद्यावेळेस रुग्णालयातील वीज नाहीशी झाली तरी या फिरत्या प्लांटद्वारे वीजपुरवठाही करता येऊ शकतो.'

loading image
go to top