Pune Crime : हॉर्न वाजवल्याने भडकला राष्ट्रवादीचा नेता; कारमधून उतरुन तरुणीला मारहाण

Dayanand IrkaL
Dayanand IrkaL

पुणे - पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी २५ वर्षे तरुणीने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. (A NCP leader beat up a young woman)

Dayanand IrkaL
Devendra Fadnavis : "माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला तरी..." ; शपथविधीवर देवेंद्र फडणवीस पुन्हा बोलले

या प्रकरणात पोलिसांनी दयानंद इरकल यांच्यासह संध्या माने इरकल तसेच इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रात्री पावणे ९ च्या सुमारास घडली.

फिर्यादी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती मंगळवारी रात्री पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरून पूना हॉस्पिटलच्या दिशेने तिच्या दुचाकी वरुन प्रवास करत होती. यावेळी तिच्या पुढे असलेल्या चार चाकी ( एम एच १२ डी डब्ल्यू ०००१) वाहनाला तिने हॉर्न दिला.

Dayanand IrkaL
BBC IT Survey : एक दिवस देशात मीडियाच राहणार नाही; ममता बॅनर्जींनी व्यक्त केली भीती

हॉर्न वाजवल्यामुळे इरकल यांना राग आला आणि ते गाडीतून खाली उतरले. त्यांनी त्या तरुणीला विनयभंग केला तसेच गाडीत बसलेल्या संध्या माने इरकल यांनी त्या तरुणीच्या गालावर आणि गळ्यावर नखांनी बोचकरले. तसेच हाताने आणि चापलेने मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेल्या इतर २ जणांनी देखील त्या तरुणीला मारहाण करत शिवीगाळ केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com