Pune Accident : पुण्यात बसचे ब्रेक फेल! ५ ते ६ गाड्यांना धडक, एकाचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Accident

Pune Accident : पुण्यात बसचे ब्रेक फेल! ५ ते ६ गाड्यांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

खाजगी बस चा ब्रेक निकामी होऊन उंड्री मध्ये अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. खाजगी बस उंड्री च्या दिशेने जात असताना ऑर्चिड पॅलेस येथील असलेल्या तीव्र उतारावर गाडीचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला.

बस पुढे असणाऱ्या सहा गाड्याना धडक देत थांबली. यामध्ये तीन कार,एक रिक्षा,टेम्पो आणि एक दुचाकीचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच कोंढवा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तातडीने घटनासाठी धाव घेत मदत कार्य सुरू केले.

रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमींना दवाखान्यात पाठवले. सात वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याने येथे वाहातुक कोंडी झाली होती. अपघात ग्रस्त वाहने बाजूला काडून पोलिसांनी वहातुक सुरळीत केली.

वाहन चालक मैनुद्दीन मेहबूब शेख (वय 42, रा. नाना पेठ, कॅम्प चौक ,पुणे) यास ताब्यात घेऊन पोलीस पुढील तपास करत आहेत.असे कोंढवा पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी सांगितले. (pune news)

टॅग्स :Pune NewsPune Accident