राजगडावर चढाई करताना पुण्यातील वृद्ध पर्यटकाचा मुत्यू

राजगड किल्ल्यावर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फणशी मार्गे पायी चढाई करताना दिलीप हे चक्कर येऊन रस्त्यावर पडले
राजगडावर चढाई करताना पुण्यातील वृद्ध पर्यटकाचा मुत्यू
राजगडावर चढाई करताना पुण्यातील वृद्ध पर्यटकाचा मुत्यू esakal

वेल्हे,(पुणे) : दुर्गम राजगड किल्ल्यावर पायी चढाई करतांना पुण्यातील वृद्ध पर्यटकाचा रविवार ( ता.२८) रोजी मुत्यू झाला. दिलीप बबनराव महामुनी ( वय ६४ ,रा.सुतारवाडी, पाषाण )असे मयत वृद्ध व्यक्तीचे नाव असून किल्ल्यावर फिरायला आलेल्या ग्रुप मधील सदस्य पांडुरंग पंडित यांनी वेल्हे पोलिसांत याबाबत फिर्याद दिली आहे.

राजगडावर चढाई करताना पुण्यातील वृद्ध पर्यटकाचा मुत्यू
संजय राऊतांनी दिलं 'PM की शादी'चं आमंत्रण; लेकीची लग्नपत्रिका चर्चेत

राजगड किल्ल्यावर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फणशी मार्गे पायी चढाई करताना दिलीप हे चक्कर येऊन रस्त्यावर पडले. त्यांच्या सहकारी मित्रांनी स्थानिक ग्रामस्थ व पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ यांच्या मदतीने त्यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी वेल्हे येथिल सरकारी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र तेथे उपचारा आधी त्यांचा मुत्यू झाल्याचे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले.

राजगडावर चढाई करताना पुण्यातील वृद्ध पर्यटकाचा मुत्यू
राज्यभरात एसटीवर दगडफेकीच्या घटना

या प्रकरणी वेल्हे पोलीस तपास करत आहेत. वेल्हे पोलीस ठाण्याचे हवालदार पंकज मोघे,अभय साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोघे म्हणाले ,मयत दिलीप महामुनी हे आपल्या मित्रां समवेत काल गडाच्या पायथ्याला फणशी गावात आले होते. तेथून आज सकाळी सर्वजण पायी राजगडावर चालले होते. महामुनी व इतर सहकारी पाठीमागे होते . चालताना अचानक चक्कर येऊन महामुनी रस्त्यावर पडले. त्यांच्या मुत्युचे नेमके कारण समजू शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com