तुमचे आधार रेशनकार्डला लिंक आहे का?

एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे अद्याप आधार लिंक नाही; आधार लिंक न केल्यास रेशनकार्डमधून नाव वगळणार
Ration Card Adhar card link
Ration Card Adhar card linkSakal

पुणे - तुम्ही रेशन दुकानातून धान्य घेत असाल तर तुमचे आधारकार्ड रेशनकार्डला लिंक केले आहे का? नसल्यास तुमचे नाव रेशन कार्डमधून वगळण्यात येइल. दरम्यान, एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी अद्याप आधार लिंक केले नसल्याचे समोर आले आहे. संबंधित लाभार्थ्यांना आधार कार्डची झेरॉक्स रेशन दुकान किंवा परिमंडळ कार्यालयात ३१ जुलैपर्यंत द्यावी लागणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी शिबिरे घेण्यात आली. परंतु अद्याप एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक झालेले नाही. तसेच, सलग तीन महिने धान्य न घेणाऱ्या कार्डधारकाचे धान्य बंद करण्यात येणार आहे. परंतु त्यांनी परिमंडळ कार्यालयात आधार कार्डची प्रत दिल्यास दोन महिन्यानंतर धान्य दिले जाणार आहे.

मृत व्यक्तींचे नावे कमी करणार

कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास किंवा विवाहानंतर मुलगी सासरी गेल्यास त्यांचे नाव रेशनकार्डमधून कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी पुरवठा विभागाकडून अभियान राबविण्यात येत आहे. शिबिरात शक्य न झाल्यास संबंधित रेशन कार्डधारकांनी परिमंडळ कार्यालयात कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारमार्फत कोरोना कालावधीत प्रधानमंत्री कल्याण गरीब (पीएमजीकेवाय) योजनेंतर्गत गहू आणि तांदूळ मोफत दिला जात आहे. ही योजना येत्या सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. आधार लिंक करण्यासाठी पुरवठा विभागाकडून शिबिरांचे आयोजन करण्यात आले. परंतु ज्या कार्डधारकांनी आधार लिंक केलेले नाही, त्यांनी परिमंडळ कार्यालयात रेशनकार्ड आणि आधारकार्डची झेरॉक्स द्यावी. अन्यथा त्यांची नावे वगळण्यात येतील.

- सुरेखा माने, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे.

गरजू कार्डधारकांना धान्य उपलब्ध होण्यासाठी आधार लिंकची प्रक्रिया लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच, धान्य वितरणासाठी कार्डधारकांकडून बायोमेट्रिक ठसा घेताना तांत्रिक अडचणी येत आहेत. पुरवठा विभागाने तांत्रिक अडचणी दूर कराव्यात.

- गणेश डांगी, अध्यक्ष- रेशन दुकानदार संघटना, पुणे शहर.

एकूण लाभार्थी (पुणे, पिंपरी-चिंचवड शहर) - १३ लाख ३२ हजार २४५

आधार लिंक झालेले लाभार्थी - १२ लाख २८ हजार ६१२

विधानसभानिहाय परिमंडळ कार्यालयांची ठिकाणे :

वडगाव शेरी - ई. विभाग : येरवडा मनपा क्षेत्रीय कार्यालय

शिवाजीनगर आणि कोथरूड- ‘क’ आणि ‘ल’ विभाग : शिवाजीनगर न्यायालयाच्या मागे

खडकवासला आणि पर्वती - ‘म’ आणि ‘ह’ विभाग : जिल्हा परिषद जुनी इमारत

हडपसर- ‘ड’ विभाग : ससाणेनगर, मनपा क्षेत्रीय कार्यालयाजवळ

पुणे कॅन्टोन्मेंट - ‘ब’ विभाग : एस.टी. बसस्थानक बिल्डींग, दुसरा मजला, पुणे स्टेशनजवळ.

कसबा पेठ - ‘ग’ विभाग : श्रीपाल सोसायटी, महात्मा फुले मंडईजवळ

पिंपरी आणि चिंचवड- ‘अ’ विभाग : निगडी बसस्टॉपजवळ, हॉटेल सावली, पहिला मजला.

भोसरी - ‘फ’ विभाग : मनपा क्षेत्रीय कार्यालय, पांजरपोळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com