आधारासाठी ‘आधार’ केंद्रावर हेलपाटे

अजित घस्ते
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

सहकारनगर - बिबबेवाडी क्षेत्रीय कार्यालयात अनेक नागरिक नवीन कार्ड, आधार कार्डवरील पत्ता व मोबाईल नंबर बदलण्यासाठी गर्दी करतात. मात्र, येथे एकच मशिन असल्याने टोकन मिळण्यास त्यांना अडचणी येत आहेत; तसेच अधूनमधून उद्भवणाऱ्या इंटरनेटच्या अडचणींमुळेदेखील नागरिकांना ‘आधार’ कार्ड मिळणे अवघड झाले आहे. याबाबत ‘व्हीएफएस ग्लोबल सर्व्हिस’चे मयूर पाटील म्हणाले, ‘‘या ठिकाणी एकच मशिनवर कामकाज सुरू असून, दिवसभरातून किमान २० ते २५ टोकन दिले जातात. यामध्ये नवीन कार्ड व दुरुस्ती केली जाते. 

आधार कार्डासाठी टोकन दिलेल्या नागरिकांना वेळेनुसार वेळ व दिनांक सांगितले जाते. कधी-कधी इंटरनेट नेटवर्क अडचणीमुळे नागरिकांना घरी परतावे लागते. अतिरिक्त लोकांची नोंदणी करणे अशक्‍य आहे.’

आधार कार्डामध्ये मोबाईल क्रमांकाचा समावेश करण्यासाठी बिबवेवाडी वॉर्ड ऑफिस येथे पाच दिवस चकरा मारत असून, अद्याप टोकन मिळालेले नाही. सकाळपासून रांगते टोकनसाठी उभी आहे.
- यशदा पाटोळे, नागरिक

Web Title: Aadhar Card Center