आदित्य ठाकरे-राहुल गांधी यांच्यात भेट; चर्चेत...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

नवी दिल्ली : शिवसेनेचे युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांची ही भेट नेमकी कशासाठी हे अद्याप समजू शकले नाही.

Image result for aditya thackeray

मात्र, मकरसंक्रातनिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aaditya Thackeray met Congress leader Rahul Gandhi today