आखाड पार्ट्यांचा जोर वाढला

महेंद्र शिंदे
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

खेड-शिवापूर : आखाड महिन्याचा उत्तरार्ध सुरु झाला असून खेड-शिवापूर परीसरात 'आखाड पार्ट्यां'नी जोर धरला आहे. विविध मांसाहारी हॉटेलात खवैय्यांची गर्दी होत असून शेतांमध्येही आखाड पार्ट्या रंगू लागल्या आहेत.

आषाढ महिन्यात (आखाड) मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाण्यावर भर असतो. अनेक जण घरगुती मांसाहाराचा बेत करुन आखाड साजरा करतात. मात्र गेल्या काही वर्षात आखाड महीना इव्हेंट झाला आहे. सध्या कुटुंबीय, मित्र-मंडळी, कार्यालयातील सहकारी यांच्यासोबत एकत्र येऊन आखाड साजरा करण्याकडे कल वाढला आहे.

त्यामुळे अनेकजण आखाड साजरा करण्यासाठी विविध मांसाहारी हॉटेलांना पसंती देत आहेत. खेड-शिवापूर परिसर मांसाहारी हॉटेलांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच या भागातील मांसाहारी हॉटेलात खवैय्यांची गर्दी वाढू लागली आहे. तर अनेक जण गावरान पद्धतीने शेतांमध्ये आखाड पार्ट्या करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळेच या भागातील शेतांमध्ये आखाड पार्ट्या रंगू लागल्या आहेत. आखाड महीना संपण्यास एक आठवडा बाकी असल्याने आखाड पार्ट्यांनी जोर धरला आहे.

तुपातलं मटन, गावरान कोंबडा, तांबडया आणि काळ्या रस्स्यातील मटन, मटन-चिकन दम बिर्याणी, तंदूर, मच्छी फ्राय या पदार्थांना हॉटेलांमधुन मागणी आहे. तर अनेकजण शेतात चुलीवर गावरान पद्धतीने बनविलेल्या मटन भाकरीवर ताव मारून आखाड साजरा करत आहेत.

Web Title: Aakhad party fever in khed-shivapur