आळंदी चौघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

मंगळवारी (ता.२६) पुणे आळंदी रस्त्यावर वडमुखवाडी येथे  नगरसेवक बालाजी कांबळे यांचा अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून खून केला होता.कालपासून आळंदीत वातावरण काहीसे तणावचे होते.

आळंदी - भाजपाचे आळंदी पालिका नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर आज  दुपारी शोकाकूल वातावरणात आळंदीतील इंद्रायणीतिरी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला.दरम्यान सकाळी कांबळे यांचा मृतदेह वायसिएम रूग्णालयातून शवविच्छेदनानंतर ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी दिघी पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केल्याने पुणे आळंदी रस्त्यावर वातावरण थोडेसे संतप्त स्वरूपाचे होते. मात्र या खूनातील चार संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर वातावरण काहिसे निवळले मात्र आरोपीना मोका लावण्याची मागणी नातेवाईकांनी केली.

मंगळवारी (ता.२६) पुणे आळंदी रस्त्यावर वडमुखवाडी येथे  नगरसेवक बालाजी कांबळे यांचा अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून खून केला होता.कालपासून आळंदीत वातावरण काहीसे तणावचे होते. दिघी पोलिस आणि आळंदी पोलिसांनी देहूफाटा परिसरात बंदोबस्त ठेवला होता.तर कांबळे यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर आज नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह सकाळी ठिक दहाच्या सुमारास पुणे आळंदी रस्त्यावर साईमंदिरशेजारील वडमुखवाडी येथील दिघी पोलिस ठाण्यासमोर ठेवून खूनाच्या घटनेचा तिव्र शब्दात निषेध केला. भर रस्त्यात दिवसा खून होवूनही आरोपी पकडले जात नसल्याने कांबळे यांच्या नातेवाईकांच्या चेह-यावर संताप होता.मात्र दिघी पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यामागचा मास्टरमाईंडचा शोध घेत असल्याचे सांगितल्यावर वातावरण काहिसे निवळले.त्यानंतर कांबळे यांचा मृतदेह आळंदीतील त्यांच्या निवासस्थानी आणला. यावेळी राज्यमंत्री दिलिप कांबळे आणि आमदार बाळा भेगडे यांनी कांबळे यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. नंतर ठिक पावणे अकराच्या दरम्यान इंद्रायणीतिरी स्मशानभूमीत कांब
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: aalandi