मोदी सरकार लोकहितविरोधी; पुण्यात केजरीवालांच्या पक्षाची इंधन दरवाढीविरोधात निदर्शने

aam.jpg
aam.jpg

पुणे : केंद्रातील नरेंद्र मोदींच्या सरकारच्या लोकहित विरोधी धोरणांचा, विशेषत: नुकत्याच झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साईज करवाढीच्या विरोधात शनिवारी आम आदमी पक्षाने पुण्यात बालगंधर्व चौकात निदर्शने केली. ही करवाढ ताबडतोब मागे घेण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षाने केलेली आहे.

आज पुण्यात डिझेल किमत ७७.५० तर पेट्रोल ८७ प्रती लिटर झाली आहे. कोरोना संकटामुळे आज सामान्य जनतेच्या हातात पैसा नाही. अशी स्थिती असताना कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतल्या घसरणीचा फायदा जनतेला दिला असता तर त्याला दिलासा मिळाला असता त्याशिवाय आर्थिक गाडा लवकर रुळावर यायला मदत होऊ शकते .    

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव उतरलेले असताना केंद्र सरकार मात्र तेलाच्या किंमतीमधून आपला फायदा करून घेत आहे. या दरवाढीचा आणि जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या किंमती किंवा रुपयाचे अवमूल्यन आणि चलनाचा आंतरराष्ट्रीय दर या कशाचाही आधार नाही. त्यामुळे आज १८ रुपये लिटर असलेल्या पेट्रोलवर तब्बल ५० रुपये कर आकारला जातो आहे. आज यात वॅट १६.५० पैसे राज्य सरकार तर एक्साईझ ३३ रुपये केंद्र सरकार मिळवते. २०१४ मध्ये एक्सईझ ८.४५ होता. केंद्र सरकारची एक्सईझ करवाढ ही अवाच्यासवा आहे.

केंद्र सरकारने २० लाख कोटीचे कोरोना पॅकेज जाहीर केले, पण त्याचा प्रत्यक्ष फायदा सामान्य जनतेला काहीच झालेला नाही मात्र जनतेच्या खिशातून १,६ लाख कोटी रुपये करवाढीद्वारे केंद्र सरकार काढून घेत आहे. परंतु मोदी सरकारची आर्थिक धोरणं ही लोकांच्या हिताची नाहीत तर केंद्र सरकार आणि पेट्रोल कंपन्याच्या हिताची आहेत, याचा प्रत्यय या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे येत आहे.

आजच्या आंदोलनात आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत, गणेश वैराट, विक्रम गायकवाड, सुहास पवार, सुरेश पारखी, सुनील कांबळे, सईद अली, आनंद अंकुश, मनोज थोरात, सचिन बोर्डे, विकास अंकुश,संदीप सोनवणे, अरुण गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. त्यांच्या घोषणांना सामान्य नागरिकही साथ देत होते .
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com