esakal | माय-लेकींनी उलगडले कलेचे विश्‍व
sakal

बोलून बातमी शोधा

एस. एम. जोशी सभागृह - ‘आम्ही मायलेकी’ या कार्यक्रमात (डावीकडून) गायिका अंजली मराठे व आई ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, मेकअप आर्टिस्ट शिल्पा बापट व कन्या सानिका बापट, नृत्यांगना अरुंधती पटवर्धन व त्यांची आई ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर आणि मुलाखतक

‘कला शिकायची असेल तर एक उत्तम गुरू आणि पालकांचा पाठिंबा आवश्‍यक असतो. कलेवर प्रेम आणि ती शिकण्याची जिद्द असायला पाहिजे,’’ असे मत सुचेता भिडे-चापेकर यांनी व्यक्त केले. त्यांची कन्या अरुंधती म्हणाल्या, ‘‘आईला नावीन्याची आवड असल्यामुळे तिच्या लहानशा गोष्टींमधून खूप शिकायला मिळते. आज मीसुद्धा नृत्य या कलेच्या क्षेत्रात तिच्यामुळे नाव करू शकले आहे.’’ या वेळी अनुराधा मराठे यांनी घर सांभाळून गाण्याची आवड कशी जपली या आठवणी सांगितल्या.

माय-लेकींनी उलगडले कलेचे विश्‍व

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - हिंदू महिला सभा पुणेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ‘आम्ही मायलेकी’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

यानिमित्त गप्पा, गाणी व नृत्य यांची खुमासदार मैफील व मुलाखती झाल्या. यात गायिका अंजली मराठे व आई ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, मेकअप आर्टिस्ट शिल्पा बापट व कन्या सानिका बापट, नृत्यांगना अरुंधती पटवर्धन व त्यांची आई ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर सहभागी झाल्या होत्या. शुभांगी दामले यांनी त्यांना बोलते केले.

‘‘कला शिकायची असेल तर एक उत्तम गुरू आणि पालकांचा पाठिंबा आवश्‍यक असतो. कलेवर प्रेम आणि ती शिकण्याची जिद्द असायला पाहिजे,’’ असे मत सुचेता भिडे-चापेकर यांनी व्यक्त केले. त्यांची कन्या अरुंधती म्हणाल्या, ‘‘आईला नावीन्याची आवड असल्यामुळे तिच्या लहानशा गोष्टींमधून खूप शिकायला मिळते. आज मीसुद्धा नृत्य या कलेच्या क्षेत्रात तिच्यामुळे नाव करू शकले आहे.’’ या वेळी अनुराधा मराठे यांनी घर सांभाळून गाण्याची आवड कशी जपली या आठवणी सांगितल्या. त्यांची कन्या अंजली यांनी आईच्या गायनाच्या क्‍लासेसमधून शिक्षण घेतल्याचे सांगितले. शिल्पा बापट व कन्या सानिका बापट यांनी अनुभव सांगितले. काही दृकश्राव्य फिती दाखविल्या. तसेच अंजली मराठे यांनी शारदा वंदन गायले व अरुंधती पटवर्धन यांनी त्यावर नृत्य सादर केले. अनुराधा मराठे यांनी ‘सर्वात्मका शिव सुंदरा’ ही रचना गायली. डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी नृत्य व सानिका बापट यांनी मेकअपचे प्रात्यक्षिक दाखविले.