आण्णाभाऊंनी पिचलेल्या माणसांना लढायला शिकवलं - अविनाश बागवे

रमेश मोरे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी - अवघे दिड दिवस शाळेत जावुन परिस्थिती, अनुभवाने जग शिकलेल्या आण्णाभाऊंनी तळागाळातील सर्वसामान्य पिचलेल्या कष्टकरी माणसाला परिस्थितीशी लढायला शिकवले. आण्णाभाऊंनी समाजाचे दुखणे लेखणीतुन वास्तव जगासमोर मांडले. शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हा मंत्र जनमाणसात पोचवुन माणसांना उभं करण्याच कार्य आण्णाभाऊंनी केले, असे जुनी सांगवी येथे आण्णाभाऊ साठे  जयंती निमित्त मातंग एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अविनाश बागवे यांनी बोलताना व्यक्त केले.

जुनी सांगवी येथील मांतग एकता आंदोलन शाखा व रमेश दादा बागवे प्रतिष्ठान यांच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९८ व्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष सचिन साठे, माजी उपमहापौर माई ढोरे,आखिल भारतीय कॉग्रेस राष्ट्रीय सेवा दलाचे सह सचिव संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मातंग एकता आंदोलन पुणे शहर अध्यक्ष विठ्ठलराव थोरात, जेष्ठ विचारवंत प्रा. मार्तंड साठे , शिवाजीराव माने, मावळ लोकसभा युवा कॉंग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सुदामराव ढोरे हभप बब्रुवान वाघ महाराज, चिंचवड विधानसभा युवा कॉंग्रेसचे मयुर जयस्वाल, कृष्णराव गिरगुणे, बाळासाहेब शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश बागवे यांच्या हस्ते  आखिल भारतीय कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरणीत श्री संग्राम  तावडे यांची कॉग्रेसच्या सेवादल सह सचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान चिंन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष नवले यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंदन कसबे यांनी केले.तर आभार शेषेराव कसबे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिवाजी शिंदे, नरेंद्र कसबे, मुरलिधर देवरे, राजु खुडे, कमलेश साठे, किसन शिंदे, विनोद पौळ आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: aanabhau sathe jayanti in juni sangvi