आंदर मावळात पर्यटनामुळे वाढला रोजगार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

टाकवे बुद्रुक - आंदर मावळात दिवसेंदिवस वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार वाढू लागला आहे. पश्‍चिम भागातील धबधब्याखाली भिजण्यासठी आणि वर्षाविहारासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक या परिसरात येत आहे. या वर्षाच्या हंगामात आजपर्यंत ५० लाख रुपयांपेक्षा अधिक उलाढाल अपेक्षित आहे.

घरगुती पद्धतीचे जेवण, चहा, नाश्‍ता, मक्‍याचे कणीस, वाफळलेल्या शेंगा विकून ही उलाढाल लाखाच्या घरात गेली आहे. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. 

कृषी पर्यटनातून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. नुकत्याच पवन मावळातील काही तरुणांनी कृषी पर्यटनाशी निगडित प्रशिक्षण घेतले आहे. याच धर्तीवर आंदर मावळातील ५० तरुण हे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू झालेल्या पावसाने पर्यटकांची पावले आपसूक या भागात वळत आहेत. स्वातंत्र्य दिनाला वाढलेली गर्दी पतेतीपर्यंत कायम राहिली. सर्वच धबधबे गर्दीने फुल झाले होते. धबधब्याखाली भिजलेले पर्यटक घरगुती पद्धतीच्या जेवणावर ताव मारीत आहेत.

डाहूली, बेंदेवाडी, लालवाडी, कांब्रे, कुसूर, खांडीत अशी जेवणाची सोय आहे. निळशीत वायएमसीएचा कॅम्समध्येही गर्दी वाढत आहे. त्यापाठोपाठ खांडी, सावळा, तळपेवाडी, माळेगाव, पारीठेवाडीत गर्दी वाढू लागली आहे.

गोपाळ पिंगळे म्हणाले, ‘‘सध्या पर्यटकांचा ओढा या परिसरात वाढू लागला आहे. चमचमीत, मसालेदार व मांसाहारी जेवणापेक्षा साध्या जेवणाची मागणी वाढली आहे. पिठलं, भाकरी, आमटी, भात याला मागणी जास्त आहे.’’
दिलीप जगताप म्हणाले, ‘‘कुटुंबवत्सल पर्यटक धबधब्याखाली भिजण्यासाठी येत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेने यंदा गर्दी जास्त आहे.’’

Web Title: Aandar Maval Tourist Waterfall Employment