
विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी, या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केला.
पुणे : विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी, या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केला.
आम आदमी पार्टी - खराटा
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून वाहतुकीचा प्रश्न सोडविणे
- शहराच्या विकासासाठी एकात्मिक नियोजन आणि अंमलबजावणी
- ससूनच्या धर्तीवर प्रत्येक मतदारसंघात एक सुसज्ज रुग्णालय
- शहर व उपनगरांत पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा
- कचरा, सांडपाण्यावर प्रक्रिया करून शहर प्रदूषणमुक्त करणे
महापालिकेची सार्वजनिक आरोग्य योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. उपनगरे पाण्यासाठी तहानलेली आहेत तर, शहरात चालण्यासाठीही जागा राहिलेली नाही. त्यातच वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. त्यामुळे "दिल्ली मॉडेल'च्या धर्तीवर पुण्याचा विकास करण्यावर "आप'चा भर असेल, असे मुकुंद किर्दत यांनी स्पष्ट केले.