Manish Sisodia : मनीष सिसोदियांच्या अटकेच्या निषेधार्थ ‘आप’ची पुण्यात निदर्शने

दिल्लीतील सरकारी शाळांचा कायापालट करून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या सिसोदिया यांची अटक
AAP protests in Pune arrest of Manish Sisodia politics
AAP protests in Pune arrest of Manish Sisodia politicsesakal

पुणे : आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ ‘आप’च्यावतीने सोमवारी (ता.२७) पुणे शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली.

दिल्लीतील सरकारी शाळांचा कायापालट करून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या सिसोदिया यांची अटक म्हणजे केंद्र सरकारने अंमलबजावणी संचालनालय (इडी) आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) यांच्यामार्फत विरोधकांवर चालवलेली दडपशाही असल्याचा आरोप या पक्षाचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी या निदर्शने आंदोलनाच्या वेळी बोलताना केला.

पुण्यातील बालगंधर्व चौकातील झाशीची राणी पुतळ्यासमोर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी विजय कुंभार यांच्यासह पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, पक्षाच्या वाहतूक विभागाचे राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, आनंद अंकुश, सुजित अग्रवाल,

प्रभाकर कोंढाळकर,मीरा बीघे, सीमा गुट्टे, वैशाली डोंगरे, किरण कद्रे, किशोर मुजुमदार, घनश्याम मारणे, किरण कांबळे, शेखर ढगे, मनोज शेट्टी, अमोल काळे, राजू परदेशी, साहिल परदेशी, फेबियन सॅमसन, किर्ती सिंग चौधरी आदींसह ‘आप’चे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम आदमी पक्षाने दिल्लीत आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले आहे. या कामांची दखल देशातील जनतेने घेतली असून केवळ दहा वर्षात आप हा राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारूपाला आला आहे. पक्षाला जनतेचा प्रचंड मिळत आहे. त्यामुळे भाजप चिंताग्रस्त झाला आहे.

भाजपला आरोग्य, शिक्षण क्षेत्रात कधीच भरीव कामगिरी करता न आल्याने भाजपकडून आकसाने दिल्लीतील आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री व अन्य प्रमुख नेत्यांवर सूडभावनेतून कारवाई केली जात आहे. यासाठी पक्षाच्या नेत्यांवर खोटे आरोप करून इडी आणि सीबीआय यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला दात असल्याचा आरोपही कुंभार यांनी यावेळी केला.

मनीष सिसोदिया यांच्यावर लावलेले आरोप खोटे असून, त्यांच्यावरील हे खोटे आरोप त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाच्या विरोधात संविधानिक मार्गाने जोरदार लढाई लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी केंद्र सरकारला दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com