'आप'चे उद्या राज्यभर आंदोलन; 'ही' आहे मागणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020


या आंदोलनाद्वारे राज्यभरात जिल्हाधिकारी तालुक्‍याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार आहेत. तसेच राज्यभरातील वीज ग्राहकांच्या भावना अधोरेखित करणारे व्हिडिओ प्रकाशित करून ते सोशल मीडियावरद्वारे सरकारपर्यंत पोचवण्यात येणार आहेत.

पुणे: कोरोनाच्या भयंकर संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्यातील वीजग्राहकांची लॉकडाऊनच्या काळातील दोनशे युनिटपर्यंतची वीजबिले माफ करावीत अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. त्यासाठी उद्या (ता. 3 जून) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या आंदोलनाद्वारे राज्यभरात जिल्हाधिकारी तालुक्‍याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार आहेत. तसेच राज्यभरातील वीज ग्राहकांच्या भावना अधोरेखित करणारे व्हिडिओ प्रकाशित करून ते सोशल मीडियावरद्वारे सरकारपर्यंत पोचवण्यात येणार आहेत. या आंदोलनात आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी सामील होणार असून, गाव व शहर पातळीवरील सर्व वीज ग्राहक नागरिकांना वीज माफी आंदोलनात सामील करून घेतले जाणार आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ता आणि पुणे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी दिली.

प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे स्थानक पुन्हा गजबजले

कोविड-19 च्या संकटामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. या परिस्थिती मध्ये त्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे बनलेले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये सामान्य माणसाला कोणतीही थेट मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आता त्वरित राज्यातील नागरिकांचा आर्थिक ताण हलका करण्याच्या दृष्टीने पावले उचलून त्यांना दिलासा देणे गरजेचे बनले आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकार मागील दोन वर्षांपासून 200 युनिट पर्यंत वीज मोफत देत आहे, राज्यसरकारने त्यादृष्टीने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी "आप'चे संघटनमंत्री अभिजित मोरे, सहसंयोजक संदीप सोनवणे, पुणे विभागाचे सचिव गणेश ढमाले यांनी केली आहे.

आदिवासींना महिलांच्या चेहऱ्यावरील हसू सांगतय, डोक्यावरील हंडा उतरल्याचे सुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AAP will be organized agitation across the state tomorrow