आपटे, शिरोळे रस्त्याचा पाणीपुरवठा अखेर सुरू (व्हिडिओ)

शिरोळे वस्ती - गेल्या दोन दिवसांपासून येथील नागरिकांना पाणी मिळाले नाही.
शिरोळे वस्ती - गेल्या दोन दिवसांपासून येथील नागरिकांना पाणी मिळाले नाही.

पुणे - सलग तीन दिवस पाण्याअभावी हैराण झालेल्या आपटे आणि शिरोळे रस्ता परिसरातील रहिवाशांना चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पाणी मिळाले.

मात्र, कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. नगरसेवक आणि पाणीपुरवठा खात्याकडे तक्रार करूनही आम्हाला पुरेसे पाणी दिले जात नाही, अशी तक्रार येथील रहिवाशांनी केली.

साप्ताहिक देखभाल- दुरुस्तीच्या कारणांमुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद असूनही या भागात पाणी सोडण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. या भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचेही स्पष्ट केले.

शहरात सध्या रोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु काही भागांत अवेळी, तेही कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात, शिरोळे रस्त्यालगतच्या शिरोळे वस्तीत गेल्या तीन दिवसांपासून पाणी आले नव्हते. रहिवाशांच्या तक्रारींनंतर मंगळवारी रात्री टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, एकच टॅंकर दिल्याने अनेकांना पाणी मिळाले नाही.

पाणी न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देताच गुरुवारी दुपारनंतर या परिसरात पाणी सोडण्यात आले.  येथील रहिवासी छाया चव्हाण म्हणाल्या, ‘‘मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यात तीन-चार दिवस पाणी न आल्याने आम्हाला पाण्यासाठी फिरावे लागत आहे. पाणी का येत नाही, याची कारणेही सांगितली जात नाहीत. पहाटे पाणी येते; पण ते अर्धा तासही नसते.’’ 

‘या भागात सकाळी किंवा सायंकाळी पाणीपुरवठा केला पाहिजे. पाण्याच्या वेळा निश्‍चित नाहीत, त्यामुळे २४ तास पाण्याची वाट पाहावी लागते,’’ असे रेखा सोनार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com