ग्रामसेवकाच्या खुर्चीची बेलवाडी येथे आरती (व्हिडिओ)

ज्ञानेश्वर रायते
गुरुवार, 3 मे 2018

हजर नसल्याने ग्रामस्थांची "गांधिगिरी'

भवानीनगर: ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दहा- दहा दिवस हजर नसतात, दलित वस्तीच्या कामाचे प्रस्ताव पाठवीत नाहीत, अशा काही कारणांवरून आज बेलवाडी (ता. इंदापूर) ग्रामस्थांनी ग्रामसेवकांच्या खुर्चीची आरती करून गांधीगिरी केली.

हजर नसल्याने ग्रामस्थांची "गांधिगिरी'

भवानीनगर: ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दहा- दहा दिवस हजर नसतात, दलित वस्तीच्या कामाचे प्रस्ताव पाठवीत नाहीत, अशा काही कारणांवरून आज बेलवाडी (ता. इंदापूर) ग्रामस्थांनी ग्रामसेवकांच्या खुर्चीची आरती करून गांधीगिरी केली.

या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे आज परिसरात खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून गावात ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी होती. यासंदर्भात जिल्हा परिषद, पंचायत समितीला कळवूनही काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे आज हे आंदोलन करण्यात आले. आज सकाळी ग्रामपंचायतीचे सरपंच माणिक जामदार, छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतिलाल जामदार, संचालक सर्जेराव जामदार, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, माजी सरपंच यशवंत जामदार, लक्ष्मण खैरे, रामभाऊ यादव, शुभम निंबाळकर, नानासाहेब पवार, सदस्या सारिका जामदार, डॉ. योगिता खुटाळे, प्रकाश जामदार, मोहन जामदार, बापूराव जगताप यांसह ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवकाच्या खुर्चीस हार घालून सरकार, पंचायत समितीच्या नावाने निषेध करीत आरती ओवाळली व ग्रामपंचायतीच्या कार्यालयास टाळे ठोकले. जोपर्यंत ग्रामसेवकाचे निलंबन व कारवाई होत नाही, तोपर्यंत कार्यालय उघडणार नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

Web Title: aarti at the gramsevaks chair at belwadi