पुणे : हनुमान जयंती निमित्ताने मुस्लीमांच्या हस्ते आरती

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कर्वेनगर येथील हनुमान मंदिरात मुस्लिम नागरिकांच्या हस्ते हनुमान जयंतीची आरती
Aarti Hanuman Jayanti hands Muslim citizens Hanuman Temple Karvenagar behalf NCP ajit pawar
Aarti Hanuman Jayanti hands Muslim citizens Hanuman Temple Karvenagar behalf NCP ajit pawarsakal

पुणे : सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कर्वेनगर येथील हनुमान मंदिरात मुस्लिम नागरिकांच्या हस्ते हनुमान जयंतीची आरती करण्यात आली. तसेच तेथेच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत इफ्तार देऊन रोजाचा उपवास सोडला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. यावेळी प्रशांत जगताप यांनी हनुमान चालीसा म्हणली, तर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.

Aarti Hanuman Jayanti hands Muslim citizens Hanuman Temple Karvenagar behalf NCP ajit pawar
Aarti Hanuman Jayanti hands Muslim citizens Hanuman Temple Karvenagar behalf NCP ajit pawarsakal

अजित पवार म्हणाले, "विविधतेतून एकतेने नटलेल्या भारतभूमीमध्ये सर्व धर्म, प्रांत व जातीचे नागरिक गुण्या गोविंदाने राहतात.या धर्म जात प्रांत यांचे वेगवेगळे सण असून सर्व नागरिक एकमेकांचे सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. भारत देशात प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असणे , यात काही गैर नाही. परंतु आपल्या धर्माचा अभिमान बाळगत असताना दुसर्‍या धर्माचा द्वेष बाळगणे या देशाची संस्कृती नाही. उत्तरेतील राज्या प्रमाणे महाराष्ट्रात देखील काही मंडळी द्वेषाचे राजकारण करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सलोखा टिकवून ठेवण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com