‘माँ की रसोई’त आशा भोसले, महेश टिळेकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले न्यूट्रिशन पार्क गुजरातमध्ये साकारत आहे. यामध्ये मुलांसाठी विविध स्टेशन असतील. या प्रत्येक स्टेशनवर मुलांची छोटी ट्रेन थांबून तिथे असलेल्या खेळ, दूध नगरी, फलाहार, विज्ञान अशा विविध विभागांत त्या त्या संदर्भात मनोरंजनातून मुलांना माहिती दिली जाणार आहे.

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले न्यूट्रिशन पार्क गुजरातमध्ये साकारत आहे. यामध्ये मुलांसाठी विविध स्टेशन असतील. या प्रत्येक स्टेशनवर मुलांची छोटी ट्रेन थांबून तिथे असलेल्या खेळ, दूध नगरी, फलाहार, विज्ञान अशा विविध विभागांत त्या त्या संदर्भात मनोरंजनातून मुलांना माहिती दिली जाणार आहे.

या सर्व विभागांसाठी क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून ‘माँ की रसोई’साठी मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी हिंदी गीत लिहिले आहे. संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत गायिका आशा भोसले यांनी गायिले आहे.

टिळेकर यांची संकल्पना, दिग्दर्शन असलेल्या या गाण्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान आज्जीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. ‘पान खाये सय्या हमारो’ हे गाणे आशाताईंनी रेहमान यांच्यासाठी गायले होते. या वेळी पुन्हा एकदा ८६ वर्षांच्या आशाताई,  ८२ वर्षांच्या वहिदा रेहमान यांच्यासाठी टिळेकर यांनी लिहिलेल्या ‘माँ की रसोई’ या गीतासाठी ५० वर्षांनंतर गाणार आहेत. बर्ड फ्लू, चिकुनगुनियासाठी टिळेकर यांनी काही वर्षांपूर्वी तयार केलेली गाणी लोकप्रिय होऊन त्याची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद झालेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aasha Bhosale and Mahesh Tilekar in Maa ki Rasoi