विभागीय आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी

Deepak-Mhaisekar
Deepak-Mhaisekar

पुणे - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुणे ते पंढरपूर पालखी मार्गाची पाहणी करून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सुरू असलेली विकासकामे आणि दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेतला. पालखी मुक्कामांच्या ठिकाणी वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन पालखी सोहळ्यापर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, साताऱ्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील झेंडेवाडी विसावा, सासवड पालखी तळ, बेलसर फाटा, जेजूरी पालखी तळ, वेल्हा पालखी तळाची डॉ. म्हैसेकर यांनी पाहणी केली. पालखी मार्गावरील बेलसर फाटा येथे असणाऱ्या वळणावरील धोकादायक खड्ड्याला संरक्षक कठडा करावा, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील विजेचे फीडर सुरू ठेवण्यासाठी समन्वय ठेवावा, वेल्हा तळाजवळील रेल्वे ट्रॅकवरील भुयारी पुलाचे काम पालखी सोहळा मुक्कामाला येईपर्यंत पूर्ण करावे, पालखी मुक्कामी असताना रेल्वे विभागाशी रेल्वे गाड्यांच्या वेळेविषयी समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

लोणंद पालखी तळावर चिखल होणार नाही, तरडगाव मुक्कामाच्या ठिकाणी गावालगत रस्त्याच्या साइडपट्ट्या व्यवस्थित भरून घ्याव्यात, परिसरातील कालव्यातून पाणी सोडताना स्थानिक प्रशासनाने जलसंपदा विभागाशी समन्वय ठेवावा, पालखी तळावरील विजेच्या तारा आणि खांब कमी करण्यासाठी वीजतारा भूमिगत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com